शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वैरागड किल्ल्याची डागडुजी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:50 IST

वैरागड येथील ऐतिहासिक किल्ल्याची डागडुजी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु हे काम आता थांबले आहे.

ठळक मुद्देबुरूज, तट कोसळले : मोठ्या प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वैरागड येथील ऐतिहासिक किल्ल्याची डागडुजी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु हे काम आता थांबले आहे.तत्कालीन चंद्रपूरच्या गोंड राजाने बल्लाळशाहाने वैरागड येथे किल्ला बांधला. पूर्वी या ठिकाणी हिऱ्यांची खाण होती. या खाणीच्या संरक्षणार्थ हा किल्ला बांधला. पुढे हिºयांची खाण बंद पडली. तेव्हापासून या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाले. त्या काळातील वैभवशाली इतिहासाची साक्ष हा किल्ला अजूनही देत आहे.काळाच्या ओघात किल्ल्याची पडझड सुरू झाली. याकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे किल्ल्याचे तट, बुरूज उद्ध्वस्त झाले. झाडाझुडूपांनी किल्ल्याला वेढून घेतले आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर मागील सहा वर्षांपासून वैरागड किल्ल्याची थोडीफार डागडुजी व सौंदर्यीकरणाचे काम सुरू झाले आहे. मात्र मागील पाच वर्षांपासून किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या दुरूस्तीपलीकडे काम जात नसल्याचा अनुभव आहे. या कामाचे आतापर्यंत पाच कंत्राटदार बदलण्यात आले आहेत. विद्यमान कंत्राटदार केवळ १० ते १२ मजूर कामावर ठेवून कासवगतीने काम करीत आहे. या कामात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोपसुद्धा स्थानिकांकडून होत आहे. किल्ला सौंदर्यीकरणाचे काम सध्या ठप्प पडले आहे. विद्यमान कंत्राटदाराला काम करण्याबाबत सक्त ताकीद देऊन त्याच्याकडून काम करून घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.