शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वैकुंठभाई मेहता पुरस्काराने जिल्हा मध्यवर्ती बँक सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 01:13 IST

सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या निकषावर गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक म्हणून राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या सोहळ्यात जिल्हा बँकेला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

ठळक मुद्देमुंबईत पुरस्कार प्रदान : राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या निकषावर गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक म्हणून राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या सोहळ्यात जिल्हा बँकेला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.राज्याचे वैद्यकीय शिक्षण व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार व मुख्य व्यवस्थापक अरूण निंबेकर आदींनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या अध्यक्ष सुप्रिया पाटील, उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर आदी उपस्थित होते.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यात ५५ शाखांच्या माध्यमातून चार लाख ग्राहकांना बँकींग सेवा दिली जात आहे. बँकेकडे सद्य:स्थितीत १ हजार ४५० कोटींच्या ठेवी असून १ हजार ३० कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बँकेच्या सर्व शाखा सीबीएस प्रणालीवर मुख्य कार्यालयाशी जोडलेले आहेत. जिल्हाभरात बँकेचे ३० एटीएम असून ग्राहकांना मोबाईल बँकींग, आयएमपीएस सारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. जिल्ह्यातील व्यवसाय प्रतिनिधीच्या माध्यमातून जिल्ह्यात १५० मायक्रो एटीएम स्थापन करण्यात येणार आहे. याद्वारे रक्कम काढणे, जमा करणे, शिल्लक रकमेची माहिती, मिनी स्टेटमेंट फंड ट्रॉन्सफर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बँकेतर्फे शेतकरी सभासदांना १ लाख रूपे एटीएम कम डेबीट कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी नाबार्डच्या सहाय्याने जिल्ह्यातील २१० गावांमध्ये आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बँकेला नुकताच ‘बँको ब्ल्यू रिबन’ सन २०१८ च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

टॅग्स :bankबँक