शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो कामावर ट्रॅक्टरचा सर्रास वापर

By admin | Updated: May 24, 2016 01:29 IST

नोंदणीकृत प्रत्येक मजुरांना १०० दिवस रोजगार देण्याची हमी शासनाकडून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत दिली जाते.

योजनेचे स्वरूप बदलले : मजुरांचा रोजगार हिरावला; फरी येथील प्रकारमोहटोला (किन्हाळा) : नोंदणीकृत प्रत्येक मजुरांना १०० दिवस रोजगार देण्याची हमी शासनाकडून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत दिली जाते. मात्र या योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामात ट्रॅक्टरचा सर्रास वापर होत असल्याने मजुरांचा रोजगार हिरावला आहे. सदर प्रकार शिवराजपूर गट ग्रामपंचायतींतर्गत फरी येथील मामा तलाव खोलीकरणाच्या कामात दिसून येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेवरील कामांसाठी सरकार दरवर्षी अंदाजपत्रकात कोट्यवधी रूपयांच्या निधीची तरतूद करते. शिवाय प्रत्येक नोंदणीकृत मजुराला १०० दिवसांचा रोजगार देण्याची कायद्यात तरतूद आहे. १०० दिवस पुरेल, एवढ्या रोजगाराचे नियोजनही नरेगा विभागाच्या वतीने केल्या जाते. मात्र ट्रॅक्टरचा वापर होत असल्याने मजुरांचा रोजगार हिरावला जात असल्याचे दिसून येत आहे. शिवराजपूर गट ग्रामपंचायती अंतर्गत फरी येथे मामा तलावाच्या खोलीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. या कामावर एकूण २१५ मजूर कार्यरत असून १२ ते १३ ट्रॅक्टरचा देखील या कामावर वापर केला जात आहे. मजुरांचे पायदळ चालणे अधिक होऊ नये तसेच तलावाच्या पाळीवर चढताना मजुरांना अधिक त्रास होऊ नये, यासाठी तलाव खोलीकरणाची माहिती मजुरांकरवी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरून सदर माती इतरत्र फेकली जात असल्याचे संबंधित ग्रामरोजगार सेवकाने सांगितले. जी चलाई ट्रॅक्टरला दिली जाते. तीच चलाई मजुरांना देण्यात आली तर तलावाची पाळ रूंदावेल व मजबूतही होईल. यातून मजुरांना अधिक दिवस काम मिळू शकेल. मात्र संबंधित यंत्रणेने असे काहीही न करता मामा तलाव खोलीकरणाच्या कामात ट्रॅक्टरचा वापर सुरू केला आहे. (वार्ताहर)