शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारीसाठी नवीन तंत्र वापरा

By admin | Updated: October 30, 2015 01:36 IST

गडचिरोली जिल्ह्यात तलाव, बोडी, नदी, नाले यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर पर्जन्यमानाचेही प्रमाण अधिक असल्याने मासेमारी व्यवसायास मोठा वाव आहे.

विभागीय आयुक्तांचा सल्ला : मासेमारी प्रकल्पाची केली पाहणीगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात तलाव, बोडी, नदी, नाले यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर पर्जन्यमानाचेही प्रमाण अधिक असल्याने मासेमारी व्यवसायास मोठा वाव आहे. मासेमारीसाठी महिला बचतगटांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असा सल्ला विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी दिला.महिला आर्थिक विकास महामंडळाच्या एमआयडीसीमधील कार्यालयाच्या परिसरातील मासेमारी प्रकल्पाची बुधवारी पाहणी केली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, माविमच्या जिल्हा समन्वयक कांता मिश्रा, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, सर्चचे डॉ. अनंत बंग आदी उपस्थित होते. मासेमारी (केज) प्रकल्पाची सुरुवात जिल्ह्यात महिला गटांनी केली आहे. यासाठी तयार करण्यात येणाऱ्या लोखंडी सापळ्यांचा खर्च खूप मोठा आहे. त्यामुळे फायबरसारख्या कमी किंमतीच्या सापळ्यांची उपलब्धतता झाल्यास अधिकाधिक जणांना हा व्यवसाय सुरू करता येईल. खर्च कमी येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे निर्देशसुद्धा विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी अधिकाऱ्यांना दिले. (नगर प्रतिनिधी)