शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो कामात जेसीबीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:26 IST

आरमोरी तालुक्याच्या जोगीसाखरा परिसरातील सावलखेडा ग्राम पंचायतींतर्गत असलेल्या भगवानपूर येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिमेंट काँक्रिट साठवण बंधाºयाचे काम सुरू आहे. मात्र या कामात मजुरांऐवजी जेसीबी यंत्राचा वापर होत असल्याने स्थानिक मजुरांचा रोजगार हिरावल्या गेला आहे. स्थानिक मजुरांचा हक्काचा रोजगार हिरावून योजनेच्या कामात यंत्राचा वापर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भगवानपूर येथील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देमजुरांचा रोजगार हिरावला : भगवानपूर येथे सुरू आहे साठवण बंधाऱ्याचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : आरमोरी तालुक्याच्या जोगीसाखरा परिसरातील सावलखेडा ग्राम पंचायतींतर्गत असलेल्या भगवानपूर येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिमेंट काँक्रिट साठवण बंधाऱ्याचे काम सुरू आहे. मात्र या कामात मजुरांऐवजी जेसीबी यंत्राचा वापर होत असल्याने स्थानिक मजुरांचा रोजगार हिरावल्या गेला आहे.स्थानिक मजुरांचा हक्काचा रोजगार हिरावून योजनेच्या कामात यंत्राचा वापर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भगवानपूर येथील नागरिकांनी केली आहे.सावलखेडा गट ग्राम पंचायतींतर्गत भगवानपूर येथील पांडुरंग दुमाने यांच्या शेताजवळ जि. प. सिंचन उपविभाग कुरखेडाच्या वतीने सिमेंट काँक्रिट साठवण बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र अकूशल माती खोदकाम मजुरांऐवजी जेसीबीच्या सहाय्याने करण्यात येत आहे. सन २०१७-१८ वर्षातील या बंधाऱ्याच्या बांधकामाला १२ एप्रिल २०१८ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर दीड महिने काम झाले नाही. पावसाळा जवळ आल्याचे कारण पुढे करीत संबंधित अधिकाऱ्यांनी यंत्राच्या सहाय्याने अकूशल काम हाती घेतले. प्रति दिवस २०३ रूपये प्रमाणे २ हजार ७४१ मनुष्य दिवस इतके मजुरांना काम मिळाले असते. मजुरीची रक्कम खरीप हंगामातील साहित्य खरेदीसाठी शेतमजुरांना उपयोगी आली असती. मात्र वनाधिकाऱ्यांच्या नियोजन शून्यतेमुळे रोहयो मजूर कामापासून वंचित राहिले आहेत. परिणामी या योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे.मजुरांकडून काम करून घेण्याची मागणीनोंदणीकृत मजुरांना १०० दिवसांचा रोजगार देण्याची हमी रोजगार हमी योजनेच्या कायद्यात नमूद आहे. रोजगार निर्मितीसाठी रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे मंजूर केली जातात. मात्र भगवानपूर येथे २४ लाख ७३ हजार रूपये किमतीच्या साठवण बंधारा खोदकामात मजुरांना बोलाविण्यात आले नाही. त्यामुळे गावातील स्थानिक नोंदणीकृत मजूर नाराज झाले आहेत. सदर प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही स्थानिक मजुरांनी केली आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष घालून सदर सिमेंट काँक्रिट साठवण बंधाºयाचे काम स्थानिक मजुरांकडून करवून घ्यावे, अशी मागणी मजुरांनी केली आहे. याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.