शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यात तण व कीड नियंत्रणासाठी होतोय बदकांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 14:29 IST

देसाईगंज तालुक्यातील नैनपूर येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तण व कीड नियंत्रणासाठी बदकांचा वापर करण्याचा प्रयोग राबविला आहे.

ठळक मुद्देनैनपूर येथील शेतकऱ्यांचा धान शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग

विष्णू दुनेदारलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली:  देसाईगंज तालुक्यातील नैनपूर येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तण व कीड नियंत्रणासाठी बदकांचा वापर करण्याचा प्रयोग राबविला आहे.आत्माअंतर्गत नैनपूर येथे भाग्यश्री सेंद्रिय शेतकरी गट स्थापन करण्यात आला आहे. या गटात २० शेतकरी आहेत. ते सर्वजण धानाची शेती करतात.बदक हा बहुउद्देशीय पक्षी आहे. कोणत्याही तापमानात बदक सहज टिकतो. किटक हे बदकांचे प्रमुख खाद्य आहे. कोरिया, जपान, थायलंड या देशांमध्ये मोठ्या प्रमानात 'राईस डक फार्मिंग करतांना बदकांचा वापर केला जातो. हाच धागा पकडून नैनपुरातील शेतकऱ्यांनी या प्रयोग सुरू केला आहे.यासाठी गटाने २० बदके खरेदी केली आहेत. त्यांचे व्यवस्थापन व पोषणाची जबाबदारी गटाने घेतली आहे. गटातील शेतकऱ्यांच्या शेतात ही बदके सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत आळीपाळीने सोडली जातात. धानाच्या शेतातील तण, खोडकिडे, तुडतुडे व अन्य किटक ही बदके पाहता पाहता फस्त करीत जातात. शिवाय त्यांच्या पायांमुळे शेतजमीन भुसभुशीत होऊन तिची सुपीकता वाढण्यास मदतच होते. याखेरीज बदकाची अंडीही मिळत असून त्याची विक्री करण्यात येते आहे. शेतकऱ्यांनी हा केलेला प्रयोग परिसरात चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरतो आहे.सेंद्रिय धान शेतीत बदक वापरल्याने सेंद्रिय शेतीची चाचणी, कीड व तण निर्मुलन,बदकांपासून आर्थिक उत्पादन मिळते तसेच पर्यावरण संतुलन व रक्षणाच्या दृष्टीने धान शेतीत बदकांचा वापर हितकारक आहे.डॉ.प्रकाश पवारप्रकल्प संचालक आत्मागडचिरोली.---------------------------------बदक हा बहुउद्देशीय पक्षी आहे. बदकाचा वापर कीड खाण्यासाठी व अंड्यांसाठी होतो. बदक पैदास प्रक्षेत्रात हॅचरीची सुविधा असल्याने शेतकऱ्यांनी बदकांची मागणी केल्यास स्वस्त दरात बदक पिल्ले उपलब्ध करुन देता येईल .डॉ.पी.जी.सुकारेपशुधन विकास अधिकारीबदक पैदास प्रक्षेत्र वडसा

टॅग्स :agricultureशेती