शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

गोवऱ्यांसाठी बसस्थानकाचा वापर

By admin | Updated: June 13, 2014 00:07 IST

प्रवाशांचे उन्ह, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे, यासाठी बस थांबा तिथे बसस्थानक राज्य परिवहन महामंडळातर्फे योजना राबविली जात आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक बसथांब्यावर बसस्थानकाच्या

गडचिरोली : प्रवाशांचे उन्ह, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे, यासाठी बस थांबा तिथे बसस्थानक राज्य परिवहन महामंडळातर्फे योजना राबविली जात आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक बसथांब्यावर बसस्थानकाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु बसस्थानकाच्या इमारतीचा वापर प्रवाशांसाठी कमी तर खासगी व्यावसायिक व बसस्थानक गावात असल्यास त्याचा वापर गोवऱ्या, सरपण यासह घरातील अडगळीतील वस्तू ठेवण्यासाठी केला जात असल्याचे अमिर्झा येथील बसस्थानकावरून दिसून येत आहे. तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेल्या अमिर्झा येथील अमिर्झा-दिभणा मार्गावरील बसस्थानकावर गोवऱ्या ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय बसस्थानक जागोजागी तुटलेले असल्याने फरशीवर जागोजागी खड्डे पडले आहेत. प्लॉस्टर खोदकाम केल्याप्रमाणे व्यक्तीगत नावे लिहून ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी बांधण्यात आलेले बसस्थानक दूरवस्थेत आहे. बसस्थानकात स्वच्छता ठेवणे ही प्रवाशांची जबाबदारी तर असते शिवाय ग्रामपंचायत व गावातील नागरिकांचीही जबाबदारी असते. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने बसस्थानकात होत असलेल्या खासगी वस्तू ठेवण्याच्या वापराबद्दल मौन बाळगून आहेत. एकूणच अमिर्झा येथील बसस्थानकात घाणीचे साम्राज्य असून प्रवाशी बसस्थानकासा जाण्यास धजावत नाही. त्यामुळे अनेक प्रवासी खासगी पानटपऱ्या तसेच व्यावसायिकांच्या चबुतऱ्यावर किंवा ओट्यांवर बसतात. (शहर प्रतिनिधी)