शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात खराब साहित्यांचा वापर

By admin | Updated: October 5, 2016 02:12 IST

स्थानिक पंचायत समिती अंतर्गत येमली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी

येमली जि.प. शाळेतील प्रकार : शाळा समितीने केला पंचनामाएटापल्ली : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत येमली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी समितीची स्थापना झाल्यापासून शाळा व्यवस्थापन समितीची आजवर एकही सभा घेतली नाही. सदर शाळा मुख्याध्यापकांकडून अनागोंदी कारभार सुरू असून शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी मंगळवारी थेट येमली शाळेला भेट देऊनया शाळेच्या व्यवस्थापनाचा पंचनामा केला. दरम्यान शाळेत उपलब्ध असलेले जुने तांदूळ, मूगडाळ, तूरडाळ, वटाणे, मिरची व हळद पावडर पूर्णत: खराब झाल्याचे निदर्शनास आले. या शाळेत सदर साहित्याचा वापर विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शालेय आहारात केला जात असल्याची धक्कादायक प्रकार पुढे आला. जुन्या साठ्यातील धान्याचा व साहित्याचा विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी येथे वापर केला जात असून खराब झालेले अनेक साहित्य पोषण आहारात खुलेआम वापरले जात असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना भेटीदरम्यान दिसून आले. भेटीप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सी. जे. आळे व इतर शिक्षक उपस्थित होते. मात्र शिक्षक मार्गीया हे दोन दिवसाच्या रजेवर असल्याचे निदर्शनास आले. सदर शाळेच्या मुख्याध्यापकांकडून अनागोंदी कारभार सुरू असून शाळा व्यवस्थापन समितीची आजवर एकही सभा घेण्यात न आल्याने दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी एटापल्लीचे संवर्ग विकास अधिकारी ए. एम. इल्लुरकर यांच्याकडे केली आहे. या संदर्भात थेट एटापल्ली गाठून या सदस्यांनी बीडीओला मंगळवारी लेखी निवेदन दिले. बुर्गीच्या केंद्र प्रमुखांनी येमली शाळेला २८ सप्टेंबर रोजी भेट दिली असता, शाळा व्यवस्थापन समितीची सभा आजवर एकदाही घेण्यात आली नसल्याचे त्यांना दिसून आले. दर महिन्याला समितीची सभा घेण्यात यावी, अशी सूचना केंद्र प्रमुखांनी भेटीच्या रजिस्टरमध्ये नोंदविली आहे, असेही समितीच्या सदस्यांनी बीडीओंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शालेय कॅशबूक व पोषण आहाराची माहिती मागितली असता, सदर दोन्ही दस्तावेज आपण घरी नेले आहेत, असे मुख्याध्यापक आळे यांनी आम्हाला सांगितले. सदर कॅशबूक मी तुम्हाला दाखवू शकत नाही, असे सदस्यांना सांगितल्याचे निवेदनात म्हटले आहे. बीडीओंना निवेदन देताना समितीचे अध्यक्ष बाजीराव हिचामी, उपाध्यक्ष जगपती गावडे, सदस्य दौलत गावडे, यादव दुर्गे, सुधाकर दुर्गे, मंगेश पुंगाटी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)