शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

उराडी धान खरेदी केंद्र बंद

By admin | Updated: March 21, 2015 01:51 IST

तालुक्यातील उराडी येथील सरकारी धान खरेदी केंद्रात बारदाणा नसल्याने हे केंद्र महिनाभरापासून बंद आहे.

कुरखेडा : तालुक्यातील उराडी येथील सरकारी धान खरेदी केंद्रात बारदाणा नसल्याने हे केंद्र महिनाभरापासून बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांना पडेल भावाने खासगी केंद्रांवर धान विकावा लागत असल्याने त्यांचे नुकसान होत आहे. मात्र आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.उराडी येथे आदिवासी विकास महामंडळाचे धान खरेदी केंद्र आहे. परंतु या केंद्रावर बारदाणाच उपलब्ध नसल्याने हे केंद्र महिनाभरापासून बंद आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांनी विकण्यासाठी आणलेले सुमारे ५०० क्विंटल धान पडून आहे. आठवडाभरापूर्वी अवकाळी पाऊस पडल्याने बऱ्याच धानाची नासाडीही झाली. शेतकरी धानाचे वजन करण्याची विनंती करतात. मात्र संबंधित कर्मचारी बारदाणा नसल्याचे कारण पुढे करुन वजन करण्यास नकार देतात. याबाबत आरमोरी येथील संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास तेही उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उराडी येथील केंद्र बंद असल्याने गरजू शेतकऱ्यांना देसाईगंज येथे धान न्यावे लागत आहेत. परंतु तेथे उच्च प्रतीच्या धानाला केवळ १७५० रुपयांपर्यंतच भाव मिळत आहे. सरकारी धान खरेदी केंद्रापेक्षा हा भाव १०० रुपयांनी कमी आहे. शिवाय वाहतुकीसाठी येणारा खर्च वेगळाच. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी सहकारी संस्था व बँकेकडून कर्ज घेतले होते. शून्य टक्के व्याजदराने कर्जाची परतफेड करावयाची झाल्यास ३१ मार्च ही अंतिम मुदत आहे. परंतु आता मार्च महिना संपण्यास अवघे १० दिवस शिल्लक असताना खरेदी केंद्र सुरु न झाल्याने कर्ज फेडावे कसे, असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)