आमदार उपस्थित : विकास कामांचे भूमिपूजनदेसाईगंज : तालुक्यातील कोरेगाव येथे क्रांतीवीर शहीद भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण आमदार क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. रविवारी कोरेगाव येथे आयोजित विदर्भस्तरीय आदिवासी मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, माजी आमदार रामकृष्ण मडावी, भाग्यवान खोबरागडे, जि.प.चे कृषी व पशु संवर्धन सभापती नाना नाकाडे, पंचायत समिती सभापती मोहन गायकवाड, उपसभापती गोपाल उईके, कोरेगावच्या सरपंच आळे, भूषण अलामे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी कोरेगाव येथे आमदार क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते रस्ता व नाली बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले. याप्रसंगी आमदार गजबे यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला आदिवासी बांधव मोठ्या संख्येने हजर होते. (वार्ताहर)
कोरेगावात बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण
By admin | Updated: April 10, 2017 01:00 IST