शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

...तोपर्यंत कृषीपंपांना होणार आता 24 तास वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 05:00 IST

कृषिपंपांना केवळ ८ तास वीज पुरवठा होईल, असे बुधवारच्या आदेशात वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे शेतकरी रब्बी पीक धोक्यात येण्याच्या कल्पनेने घाबरून गेले होते. आधीच नापिकीमुळे व कमी उत्पादनामुळे शेतकरी वर्ग डबघाईस आलेला आहे. त्यात फक्त ८ तासच वीजपुरवठा होणार, यामुळे तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी धास्तावले होते. 

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : तालुक्यातील धान उत्पादक व इतर शेतकऱ्यांना फक्त ८ तास वीज पुरवठा करण्याबाबत वीज कंपनीने काढलेला ५ जानेवारीचा आदेश शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर दुसऱ्याचदिवशी बदलविला. यावर तोडगा निघेपर्यंत २४ तास वीज देणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.कृषिपंपांना केवळ ८ तास वीज पुरवठा होईल, असे बुधवारच्या आदेशात वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे शेतकरी रब्बी पीक धोक्यात येण्याच्या कल्पनेने घाबरून गेले होते. आधीच नापिकीमुळे व कमी उत्पादनामुळे शेतकरी वर्ग डबघाईस आलेला आहे. त्यात फक्त ८ तासच वीजपुरवठा होणार, यामुळे तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी धास्तावले होते. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. ५ जानेवारीला तालुक्यातील कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी सुरेंद्रसिंह चंदेल, अविनाश गेडाम यांच्या नेतृत्वात देसाईगंज वीज वितरण कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. 

अन् संतप्त शेतकऱ्यांसमोर अधिकारी नरमले

-    महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ६ जानेवारीला लोडशेडिंग करून सकाळी ९ वाजता पुन्हा लाईट  सुरू केली. त्यामुळे सर्व शेतकरी संतप्त झाले. पुन्हा १२ वाजता महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले. यावेळी शेतकऱ्यांनी वीज पुरवठा करायचा असेल, तर २४ तास करा, अन्यथा वीज देऊच नका, अशी भूमिका घेतली. -    शेवटी त्यांचा आक्रोश पाहून वीज कंपनीचे अधिकारी नरमले व त्यांनी या समस्येवर जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत २४ तासच वीज पुरवठा करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी सुखावले. यावेळी नंदू चावला, विकास प्रधान, कोरेगावचे सरपंच प्रशांत किलनाके, चिंटू नाकाडे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

 

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज