शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

By admin | Updated: October 19, 2016 02:22 IST

केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षात सध्या गडचिरोली शहरात प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे.

वादंग : नव्याने आलेल्यांना संधी दिल्याचा परिणाम गडचिरोली : केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षात सध्या गडचिरोली शहरात प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी व नेतेही या वातावरणामुळे त्रस्त झाले असून पक्षात जुन्या लोकांचे ऐकून घेणारेच राहिलेले नाही, अशी खंत नाव न छापण्याच्या अटीवर एका नेत्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केली.गेले अनेक वर्ष विविध पक्ष व संघटना फिरून आलेल्या लोकांना भारतीय जनता पक्षाने नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी पक्षाच्या लोकप्रतिनिधींची व ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली व हे नेते आपल्या पक्षात प्रवेश करणार आहेत, असे सांगितले. मात्र त्यांना अटी, शर्तीवर प्रवेश देऊ नये, अशी सूचना करण्यात आली होती, अशी माहिती या ज्येष्ठ नेत्याने लोकमतला दिली. मात्र पक्षात प्रवेश होताच खासदारांनी बैठक घेऊन याच लोकांकडे गडचिरोली नगर पालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. पक्षाच्या जुन्या नेत्यांनी केवळ सतरंज्या उचलायच्या काय, असा प्रश्न आता आमच्यासमोर पडला आहे. ज्या महिलेचे नाव नगराध्यक्ष पदासाठी पक्के करण्यात आले आहे. त्या नावावरही अनेकांना आक्षेप आहे. मात्र सामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास खासदार, आमदारांना वेळ नाही. केवळ वरून निर्णय खालच्या कार्यकर्त्यावर लादले जात आहे. त्यामुळे खालचा कार्यकर्ता नगर परिषद निवडणुकीतच नाही तर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत आपली शक्ती पक्षाला दाखवून देईल, याची जाणीव या लोकप्रतिनिधी ठेवावी, असा दमही कार्यकर्ते आता पक्ष नेतृत्वाला देऊ लागले आहे. भाजपने नगराध्यक्ष पदासाठी अर्ज मागितले. मात्र योगीता प्रमोद पिपरे यांनाच उमेदवारी निश्चित होणार आहे, असा दावाही या नेत्याने लोकमतशी बोलताना केला. एवढेच नव्हे तर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अम्ब्रीशराव आत्राम यांनाही गडचिरोली नगर पालिकेच्या निवडणुकीबाबत विश्वासात घेण्यात आलेले नाही, अशी माहितीही या नेत्याने दिली. एकूणच या जबाबदार आणि ज्येष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या अस्वस्थतेमुळे पक्षाला आगामी निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)