शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लेबल नसलेल्या दारूचा पुरवठा

By admin | Updated: September 26, 2016 01:28 IST

पोलिसांच्या कारवाया वाढल्याने गडचिरोली शहरासह जिल्हाभरात दारूचा तुटवडा निर्माण झाला आहे.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात : १५ दिवसांपासून दारूचा तुटवडागडचिरोली : पोलिसांच्या कारवाया वाढल्याने गडचिरोली शहरासह जिल्हाभरात दारूचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर लेबल नसलेली दारू अवैध दारू विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. सदर दारू बनावट असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या आठ दिवसांपूर्वीपासून गडचिरोली पोलिसांनी नाकेबंदी करण्यास सुरूवात केली आहे. स्थानिक पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी नाकेबंदी करून जिल्ह्यात येणाऱ्या दारूवर धाड टाकत आहेत. त्यामुळे दारू विक्रेत्याच्या घरी वाहनाने दारूचा पुरवठा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. परिणामी मागील १५ दिवसांपासून बहुतांश पुरवठादारांनी दारूचा पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या दरम्यान सुध्दा गडचिरोली शहरात दारूचा तुटवडा निर्माण झाला होता. हा तुटवडा अजुनही कायम आहे. काही पुरवठादार मात्र पोलिसांनाही न जुमानता दारूचा पुरवठा करीत आहेत. मात्र त्यांच्याकडून लेबल नसलेल्या दारूचा पुरवठा होत आहे. दारूची बॉटल पुन्हा उपयोगात आणली असावी हे स्पष्टपणे बॉटलच्या स्थितीवरून दिसून येते. त्याचबरोबर नियमित दारूच्या तुलनेत सदर दारूने अधिक नशा येत असल्याची माहिती दारू पिणाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र सदर दारू बनावट असल्याचे स्पष्ट होत आहे. दारू पिल्यानंतर अनेकांची तब्येत सुध्दा बिघडली आहे. त्यामुळे सदर दारू आरोग्यास हानीकारक असल्याचे दारू पिणाऱ्यांच्याही लक्षात आले आहे. मात्र दररोजच्या सवयीला दवाई नाही. या म्हणी प्रमाणे आरोग्यास हानीकारक असलेली दारू पिली जात आहे. (नगर प्रतिनिधी)धाडसत्र आवश्यकलेबल नसलेली बनावट दारू नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याने गडचिरोली शहरातील सर्वच दारू विक्रेत्यांवर तत्काळ धाड टाकून सर्व दारू जप्त करणे आवश्यक आहे. अन्यथा या दारूमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.