शहरं
Join us  
Trending Stories
1
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
2
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
3
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
4
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
5
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
6
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
8
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
9
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
10
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
11
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
12
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
13
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
14
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
15
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
16
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
17
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
18
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
19
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
20
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार

विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी दिला आंदोलन करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:15 IST

विद्यापीठात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मुख्य मागणीसाठी गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या वतीने १० जूनपासून आंदोलन केले जाणार आहे.

ठळक मुद्देकर्मचारी संघटनेचा पुढाकार । १० जूनपासून आंदोलनाला होणार सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यापीठात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मुख्य मागणीसाठी गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या वतीने १० जूनपासून आंदोलन केले जाणार आहे.सातवा वेतन आयोग लागू करावा, यासाठी ३ जून रोजी कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव विभागीय सहसंचालक यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. १० जून ते १२ जूनपर्यंत विद्यापीठातील सर्व अकृषी विद्यापीठातील शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. १३ जूनपासून कार्यालयात उपस्थित सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून दिवसातून एक वेळा निदर्शने करतील. १८ जून रोजी उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल. २५ जून रोजी शिक्षण संचालनालय पुणे कार्यालयासमोर मोर्चा निघेल. २९ जून रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप आयोजित करण्यात आला आहे. एवढे आंदोलन केल्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास जुलै महिन्यात बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशारा गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेने दिला आहे.शासनाने शासकीय व निमशासकीय कार्यालये व इतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. या कर्मचाºयांना सातवा वेतन आयोगाचा लाभ सुध्दा दिला जात आहे. मात्र विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अजुनही लाभ देण्यात आला नाही. महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्या निर्देशान्वये महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये तेथील स्थानिक संघटना आंदोलन करणार आहेत. गोंडवाना विद्यापीठात सुध्दा कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव वासेकर, उपाध्यक्ष निलेश काळे, सचिव सतिश पडोळे यांनी केले आहे.या आहेत कर्मचाºयांच्या प्रमुख मागण्याविद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा. सेवा अंतर्गत आश्वासीत प्रगती योजनेबाबत पूर्वी निर्गमित केलेले शासन निर्णय पूर्ववत लागू करावे. पदे कपात करू नये. शिक्षकेत्तर पदांच्या पदभरतीस मान्यता द्यावी. समान प्रवेश परिनियम लागू करावा. नव्याने आढावा घेताना पदांमधील असमानता दूर करावी. या मागण्यांसाठी यापूर्वीही संघटनेच्या वतीने लढा देण्यात आला होता. मात्र शासन या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याने आंदोलन करण्याचा इशारा गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेने दिला आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ