शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पुढाऱ्यांमुळे नव्हे तर संविधानामुळेच अखंड भारत

By admin | Updated: February 7, 2017 00:47 IST

देशात विविधतेत एकता असतानाही देश एकात्म आणि अखंड आहे; तो राजकीय पुढाऱ्यांमुळे नव्हे तर केवळ भारतीय संविधानामुळेच होय, ..

देविदास घोडेस्वार यांचे प्रतिपादन : सामाजिक संघटनांच्या वतीने संविधान जनजागृती कार्यक्रमगडचिरोली : देशात विविधतेत एकता असतानाही देश एकात्म आणि अखंड आहे; तो राजकीय पुढाऱ्यांमुळे नव्हे तर केवळ भारतीय संविधानामुळेच होय, असे परखड मत भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक प्रा. देविदास घोडेस्वार यांनी रविवारी व्यक्त केले. स्थानिक बळीराजा पॅलेसमध्ये सोशल एज्युकेशन मुव्हमेंट, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, कुणबी समाज संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित संविधान जनजागृती कार्यक्रमात प्रा. घोडेस्वार बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादाजी चापले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून नागपूरचे ओबीसी समाज प्रवक्ता कृष्णाजी टिकले उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मजबूत केंद्र शासनाची केलेली तरतूद अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. सध्या अमेरिका, युरोपसारखे राष्ट्र बहुधर्मिय होऊ पाहत असताना भारतात विशिष्ट धर्माबाबत होणारे वक्तव्य क्लेषदायक असून देशाला विनाशाकडे घेऊन जाणारे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध देशातील संविधानाचा केलेला अभ्यास आणि त्यांची विद्वत्ता याची राष्ट्राला गरज लक्षात घेऊन त्यांना संविधान सभेत येण्यासाठी शिफारस करण्यात होती, असे प्रतिपादनही प्रा. घोडेस्वार यांनी केले. यावेळी कृष्णा टिकले म्हणाले, बाबासाहेबांना शिक्षणासाठी व चळवळीसाठी मराठा व कुणबी राजांनी सहकार्य केले. बाबासाहेबांचे कार्य संपूर्ण राष्ट्रासाठी असतानाही त्यांना केवळ एका विशिष्ट घटकापुरते मर्यादित ठेवले जात आहे, असे प्रतिपादन केले. यावेळी दादाजी चापले म्हणाले, सत्य, असत्याची शहानिशा करण्यासाठी तर्कनिष्ठेचा आधार घेऊन समाजात वैैज्ञानिक दृष्टिकोन रूजविणे गरजेचे आहे. यावेळी चापले यांनी उदाहरणेही सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोशल एज्युकेशन मुव्हमेंटचे जिल्हा संयोजक श्याम रामटेके, संचालन अशोक मांदाडे तर आभार सोशल एज्युकेशन मुव्हमेंटचे जिल्हा सहसंयोजक धर्मानंद मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारोती दुधबावरे, गोकुल झाडे, रूचित वांढरे, नम्रता मेश्राम, नूतन मेश्राम, अपेक्षा रामटेके व मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, माळी संघ, ओबीसी संघटनेच्या सदस्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)