शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायाविरोधात एकजूट व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:03 IST

ग्रामसभा कोडसेलगुडम (कमलापूर) येथे पेरमिली इलाका पारंपरिक पट्टीतील सर्व ग्रामसभांतर्फे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात अन्याय, अत्याचाराविरोधात महिलांनी आवाज उठवावा, असे आवाहन करण्यात आले.

ठळक मुद्देकोडसेलगुडम येथे कार्यक्रम : पेरमिली पारंपरिक पट्टीतर्फे ग्रामसभा

ऑनलाईन लोकमतकमलापूर : ग्रामसभा कोडसेलगुडम (कमलापूर) येथे पेरमिली इलाका पारंपरिक पट्टीतील सर्व ग्रामसभांतर्फे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात अन्याय, अत्याचाराविरोधात महिलांनी आवाज उठवावा, असे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन पेरमिलीच्या सुमन मेश्राम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कोडसेलगुडमच्या सुगंधा साकाटी होत्या. याप्रसंगी पेन कुपार लिंगो, सावित्रीबाई फुले, राणी दुर्गावती, वीर बाबुराव शेडमाके, बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.त्यानंतर नीलिमा करपेत, सीताबाई आलाम, बुजजी तोरेम, कमला तलांडी, लक्ष्मीबाई श्रीरामवर, जि. प. सदस्य ऋषी पोरतेट, येरमणारचे सरपंच बालाजी गावडे, शंकर आत्राम, कैलास कोरेत, बाजीराव तलांडी, प्रमेश वेलादी, तिरुपती कुळमेथे, लक्ष्मण कोडापे यांनी स्त्री आणि पुरुषांमध्ये कुठलाही भेदभाव न करता त्यांना समान संधी द्यावी. तसेच महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्या, असे प्रतिपादन केले. तसेच देशामध्ये महिलांवर ढोंगी बाबांकडून बलात्कार होत आहेत. त्यांना कठोर शिक्षा करावी, दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी महिलांवरही अन्याय, अत्याचार होत आहेत. हे अन्याय अत्याचार थांबवावे, दुर्गम गावातील महिलांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, तसेच अन्याय अत्याचार करणाºयांवर कठोर कारवाई करावी, यासाठी महिलांनीही शासन, प्रशासनावर दबाव आणावा, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.प्रास्ताविक कमलापूरचे माजी सरपंच सांबय्या करपेत तर आभार संतोष सिडाम यांनी केले. यावेळी पेरमिली इलाका पारंपरिक पट्टीमध्ये येणारे पेरमिली, राजाराम खांदला, कामलापूर, दमारांचा, उमानूर, जिमलगट्टा येथील ग्रामस्थ हजर होते.