शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीची अनोखी परंपरा; गडचिरोलीत जुंपते जावयांची कुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 14:50 IST

गडचिरोली जिल्ह्यातल्या अडपल्ली या गावात मात्र समस्त जावईबापूंना एकमेकांशी कुस्ती खेळून आपला मर्दानीपणा आजमावावा लागतो. ही अनोखी परंपरा अनेक वर्षांपासून अडपल्ली या गावात सुरू आहे.

ठळक मुद्देपहिल्या दिवाळीत सासरी आजमावा लागतो असाही मर्दानीपणा

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीला सासरी जाणाऱ्या जावयाचा ना-ना प्रकारे मानसन्मान आणि पाहुणचार केला जातो. पण गडचिरोली जिल्ह्यातल्या अडपल्ली या गावात मात्र समस्त जावईबापूंना एकमेकांशी कुस्ती खेळून आपला मर्दानीपणा आजमावावा लागतो. ही अनोखी परंपरा अनेक वर्षांपासून अडपल्ली या गावात सुरू आहे.गडचिरोलीपासून जवळच असलेल्या अडपल्लीत दिवाळीच्या पाडव्याला, अर्थात बलिप्रतिपदेला पाळली जाणारी ही परंपरा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यामुळे ही जावयांची कुस्ती पाहण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येने जमतात. वर्षभरात गावातील ज्या मुलीचे लग्न झाले तिच्या पतीला, अर्थात गावच्या जावयाला या पहिल्या दिवाळीचे रितसर निमंत्रण पाठविले जाते. त्यानंतर जावई व मुलीला घेण्यासाठी जाऊन लक्ष्मीपूजनच्या दिवशीच गावात आणले जाते. त्यांना नवीन कपडे घेतले जातात. बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गायींची पुजा केली जाते. गायींचा कळप गावाबाहेर ज्या ठिकाणी जमतो त्या आखरावरच मग नवीन जावयांमध्ये कुस्ती लावली जाते.या कुस्तीत हार-जीत कोणतेही बक्षीस मिळवण्यासाठी नसली तरी गावात मिळणारा मान मोठा असतो. या खेळात गावकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन होते. त्यानंतर मिरवणुकीने वाजत-गाजत जावईलोकांना त्यांच्या सासऱ्याच्या घरी पोहोचविले जाते. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेत कधी जावई उपलब्ध झाले नाही तर गावातील युवकांमध्येही कुस्ती रंगते. गावातच राहणाऱ्या भोयर कुटुंबातील व्यक्ती या कुस्तीसाठी पंचाची जबाबदारी सांभाळतात.

टॅग्स :Diwaliदिवाळी