शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांना लुटून ‘ते’ संस्थाचालक व दलाल गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2022 05:00 IST

आमच्या वेगवेगळ्या संस्था असल्याची बतावणी करून या संस्थेत मोठ्या प्रमाणात पदे निर्माण झाली आहेत. वरिष्ठ पदापासून तर कनिष्ठ पदापर्यंत जागा उपलब्ध आहेत, अशी बतावणी करण्यात आली. तसेच या पदासाठी लाखोंची डोनेशनची रक्कम  ठरवून परिसरातील दलाल व काही निकटच्या व्यक्तींना हाताशी धरून व एखाद्या कमी खपाच्या साप्ताहिकात जाहिरात देण्यात आल्या. त्यातून या टीमने डोनेशनच्या लाखो रुपयांवर टक्केवारी घेतली.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : ऐन उमेदीच्या वयापासून नोकरी केल्यानंतर संसाराची घडी व्यवस्थित बसेल व आयुष्यभराचा प्रश्न सुटेल, या दिवास्वप्नापायी अनेकांनी आपली पोटाची भाकरी अर्थात जमीनजुमला मोडून दलालाकरवी संस्थेत नोकरी मिळविण्यासाठी आटापिटा केला. पण डोनेशन देऊनही नाेकरी न मिळाल्याने सुशिक्षित बेराेजगार हवालदिल झाले आहेत. शाळेत नाेकरी लावून देण्याच्या नावाखाली करोडोंची माया जमवत संस्थाचालक व दलाल देसाईगंज परिसरातून आता ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. मागील चार दशकांपासून नोकरीच्या नावाखाली लाखो रुपयांनी  माया जमवून  दलाल मालामाल होऊन बसले आहेत. आमच्या वेगवेगळ्या संस्था असल्याची बतावणी करून या संस्थेत मोठ्या प्रमाणात पदे निर्माण झाली आहेत. वरिष्ठ पदापासून तर कनिष्ठ पदापर्यंत जागा उपलब्ध आहेत, अशी बतावणी करण्यात आली. तसेच या पदासाठी लाखोंची डोनेशनची रक्कम  ठरवून परिसरातील दलाल व काही निकटच्या व्यक्तींना हाताशी धरून व एखाद्या कमी खपाच्या साप्ताहिकात जाहिरात देण्यात आल्या. त्यातून या टीमने डोनेशनच्या लाखो रुपयांवर टक्केवारी घेतली.

‘लोकमत’च्या बातमीनंतर चुळबूळ सुरू देसाईगंज शहरातील एका संस्थेत डोनेशनच्या नावाखाली काही तरुणांनी संस्थाचालकांशी प्रत्यक्ष व काहींनी दलालामार्फत सुशिक्षित बेरोजगारांकडून लाखाेची रक्कम ओतली. या बदल्यात या टीमने नोकरीचे नेमणूक पत्रही दिले. मात्र प्रत्यक्षात नाेकरी न मिळाल्याने  फसवणूक झाल्याचे  उमेदवारांच्या लक्षात आले.  याबाबत ‘लोकमत’ने ८ जानेवारीच्या लावलेल्या बातमीनंतर शैक्षणिक वर्तुळात खळबळ माजली. हा संस्थापक, संस्थाचालक व दलाल कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फसवणूक झालेले अनेक तरुण, तरुणी आता त्या संस्थाचालक व दलालाविरोधात पोलीस स्टेशनमध्ये व संबंधित विभागाच्या वरिष्ठांकडे तक्रार देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

टॅग्स :Unemploymentबेरोजगारीfraudधोकेबाजी