शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट दर्जाचे खत जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:14 IST

शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा उचलत कमी दर्जाच्या खताची विक्री करणाºया पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच एक ट्रक खतसाठा जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई सोमवारी सायंकाळी चिचोली गावात करण्यात आली.

ठळक मुद्देपाच आरोपींना अटक : ट्रकच्या सहाय्याने गावात केली जात होती विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा उचलत कमी दर्जाच्या खताची विक्री करणाºया पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच एक ट्रक खतसाठा जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई सोमवारी सायंकाळी चिचोली गावात करण्यात आली.नागपूर येथील एमआयडीसी परिसरातील अ‍ॅग्रोसिल बायोटेक कंपनीचे सुपर सिलिका नावाचे खत धानोरा तालुक्यातील चिचोली येथे विक्री केले जात होते. कमी किमतीत खताची विक्री केली जात होती. कमी किमतीत खत मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी खताची खरेदी केली. मात्र काही नागरिकांना खताच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाली. याबाबतची माहिती धानोरा पोलीस व कृषी विभागाच्या अधिकाºयांना देण्यात आली. खत निरीक्षक कृष्णदास दोनाडकर यांनी घटनास्थळ गाठून खताच्या दर्जाची पाहणी केली. खत संशयास्पद आढळले. इन्व्हाईस चालन तपासले असता, सुपर सिलिका कंपनीचे ३६० बॅग व सुपर ग्रो कंपनीच्या १५० बॅगची नोंद होती. ट्रकमधील संपूर्ण खताची विक्री झाली होती. पीकअप वाहनामध्ये सुपर सिलिका खताच्या ३७ ते सुपर ग्रोच्या सात बॅग आढळून आल्या. सुपर सिलिका खताची किंमत प्रती बॅग ६५० रुपये व सुपर ग्रो खताची प्रती बॅग किंमत ८५० रुपये आहे. जप्त केलेल्या सुपर सिलिका खताची किंमत २४ हजार ५० व सुपर ग्रोची किंमत ५ हजार ९५० रुपये असा एकूण ३० हजार रुपयांचा खतसाठा जप्त केला. तसेच ट्रक व पीकअप वाहन सुद्धा जप्त केले.याप्रकरणी मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील राकेश वासुदेव गेडाम (२८), चंद्रपूर तालुक्यातील पिपरी येथील विवेक उत्तम निमरड (२४), चिमूर तालुक्यातील प्रल्हांद पांडुरंग भेंडारे (४४), धानोरा तालुक्यातील पवनी येथील संजय बारिकराव गावडे (२९), वरोरा येथील सुरेंद्र तुकाराम ढोकणे (३८) यांना अटक केली आहे.या आरोपींविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. या आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंके, पोलीस उपनिरीक्षक हिंमतराव सरगर, पोलीस शिपाई अमोल कोराम, रोशन केळझरकर, प्रकाश कृपाकर, कृषी विभागाचे खत निरीक्षक कृष्णदास दोनाडकर, मंडळ कृषी अधिकारी एल.एस.पाठक, कृषी पर्यवेक्षक एन.जी.बडवाईक यांनी केली.खताचे नमूने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. नमून्यांचा अहवाल आल्यानंतरच खताचा नेमका दर्जा कळण्यास मदत होईल.