शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

विषय समिती सभापतींची अविरोध निवड

By admin | Updated: January 25, 2017 02:03 IST

गडचिरोली नगरपालिकेच्या विषय समित्यांची निवडणूक मंगळवारी येथील नगरपालिकेच्या सभागृहात पार पडली.

गडचिरोली पालिका : स्थायी समितीत भूपेश कुळमेथे, मुक्तेश्वर काटवे व माधुरी खोब्रागडे यांची वर्णी गडचिरोली/देसाईगंज : गडचिरोली नगरपालिकेच्या विषय समित्यांची निवडणूक मंगळवारी येथील नगरपालिकेच्या सभागृहात पार पडली. त्यानुसार भाजपचे आनंद शृंगारपवार, अ‍ॅड. नितीन उंदिरवाडे, केशव निंबोड, अल्का पोहणकर व गुलाब मडावी यांची विषय समित्यांच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. तर दहा सदस्यीय स्थायी समितीत उपरोक्त विषय समितीच्या सभापतींसह भाजपचे भूपेश कुळमेथे, मुक्तेश्वर काटवे व माधुरी खोब्रागडे यांची निवड करण्यात आली. देसाईगंज नगर पालिकेतही पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक घेण्यात आली. यावेळी देसाईगंजचे नगराध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. गडचिरोली नगरपालिकेच्या विषय व स्थायी समितीच्या निवडणुकीकरीता जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी १९ जानेवारीला सभेची नोटीस काढली होती. त्यानुसार मंगळवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी कौस्तूभ दिवेगावकर हे पिठासीन अधिकारी म्हणून सभेला उपस्थित होते. तर सहाय्यक पिठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी कृष्णा निपाने उपस्थित होते. सुरवातीला सकाळी १० ते १२ या कालावधीत स्थायी व विषय समित्यांची सदस्यसंख्या ठरविण्यात आली. तसेच नगरपालिकेचे उपाध्यक्ष हे कोणत्या विषय समितीचे पदसिध्द सभापती असतील, हे निश्चित करण्यात आले. त्यानुसार स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य या समितीचे सभापतीपद उपाध्यक्षाकरीता निश्चित करण्यात आले. तसेच स्थायी समितीची सदस्यसंख्या दहा निश्चित करण्यात आली. दुपारी १२ ते २ या कालावधीत विषय समित्यांच्या सभापती पदासाठी नामांकन अर्ज स्वीकारण्यात आले. पाच विषय समित्यांसाठी पाचच नामांकन दाखल झाले. त्यामुळे सभापतीपदाची निवडणूक अविरोध पार पडली. त्यानंतर खासदार अशोक नेते, ज्येष्ठ पदाधिकारी बाबुराव कोहळे यांनी सर्व नवनिर्वाचित सभापतींचे व समितीच्या सदस्यांचे स्वागत केले. त्यानंतर नगराध्यक्षांच्या दालनात गडचिरोली शहर विकास करण्याबाबत मार्गदर्शन केले. (स्थानिक प्रतिनिधी)