शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित शाळेतील शिक्षक रस्त्यावर

By admin | Updated: September 29, 2016 01:38 IST

मूल्यांकनात पात्र घोषित करण्यात आलेल्या मान्यता प्राप्त खासगी प्राथमिक व माध्यमिक विनाअनुदानित

१९ सप्टेंबरच्या जीआरचा केला निषेध : जाचक अटी रद्द करून अनुदान देण्याची मागणीगडचिरोली : मूल्यांकनात पात्र घोषित करण्यात आलेल्या मान्यता प्राप्त खासगी प्राथमिक व माध्यमिक विनाअनुदानित शाळांना सरसकट २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र यासंदर्भात १९ सप्टेंबर २०१६ रोजी नवा शासन निर्णय काढून अनुदानासाठी जाचक अटी शाळांसाठी लादल्या. त्यामुळे जिल्ह्यातील विनाअनुदानित शाळांचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी बुधवारी रस्त्यावर उतरून गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात सदर जाचक अटी असलेल्या जीआरचा निषेध केला. त्यानंतर गडचिरोली जिल्हा कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. या निषेध आंदोलनाचे नेतृत्व विनाअनुदानित शाळा कृती समितीचे अध्यक्ष विलास बल्लमवार, सचिव नारायण धकाते यांनी केले.यावेळी चंद्रशेखर उईके, नागोसे, प्रकाश देसाई, चंदनखेडे, बावणे, कवाडकर, बांगरे, मंगला उईके, सहारे, दिनेश कवाळकर, गुणवंत मारगाये, दशरथ मोहुर्ले, नंदकिशोर चंदनखेडे, देवाजी पेटकुले, अवथरे, मेश्राम, दाजगाये, खांडरे, भर्रे, फुलुके, मारकवार, तितीरमारे, दिलीप तातावार, राजेश ढुमणे, हरीश गेडाम, पी. ए. सरकार, जी. पी. उंदीरवाडे, बेरूगवार, पुल्लुरवार, पुलकुवर, विनायक वासेकर, सचिन चलकलवार, अभिजीत साना यांच्यासह बहुसंख्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षकांनी राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, वित्तमंत्री यांच्या कार्यप्रणालीचा तीव्र शब्दात निषेध केला. त्यांच्या विरोधात नारेबाजीही केली. (स्थानिक प्रतिनिधी)