शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अहेरीत जळाऊ बिट व बांबू उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 23:11 IST

अहेरी शहर व परिसरातील गावांमध्ये अंत्यविधीसाठी जळावू लाकुड बिट व बांबू उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. अंत्यविधीसाठी ५ते ६ हजार रुपये खर्च करून जळाऊ लाकूड बाहेरून विकत घ्यावे लागत होते. यामुळे नागरिकांना जास्तीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी वनाधिकाऱ्यांशी चर्चा करून अहेरी येथे जळाऊ लाकुड बिट व बांबू उपलब्ध करून दिले.

ठळक मुद्देपाठपुराव्याला यश : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर नागरिकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी शहर व परिसरातील गावांमध्ये अंत्यविधीसाठी जळावू लाकुड बिट व बांबू उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. अंत्यविधीसाठी ५ते ६ हजार रुपये खर्च करून जळाऊ लाकूड बाहेरून विकत घ्यावे लागत होते. यामुळे नागरिकांना जास्तीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी वनाधिकाऱ्यांशी चर्चा करून अहेरी येथे जळाऊ लाकुड बिट व बांबू उपलब्ध करून दिले.नागरिकांकडून वनविभाग आलापल्लीकडे अहेरी येथे जळावू लाकुड बिट व बांबू उपलब्ध करून देण्याची वारंवार मागणी करूनही त्याकडे वनविभागातर्फे दुर्लक्ष केले जात होते. याबाबत भाजपा पदाधिकाऱ्यांनी ही समस्या पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिली. विषयाची गांभिर्याने दखल घेत पालकमंत्री आत्राम यांनी आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक तांबे व अहेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी चौहान यांना पाचारण करून नागरिकांची भावना लक्षात घेऊन व त्यांचे आर्थिक भुर्दंड कमी व्हावा यासाठी २ दिवसात अहेरी येते जडावू लाकूड व बांबू शासकीय दरात उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांना दिले. त्यांनतर लगेच २४ तासातच अहेरी येतील पॉवर हाऊस कॉलनी येथील वन विभागाच्या कार्यालयात जळावू बिट व बांबू वन विभागातर्फे सामान्य जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. शासकीय दरानुसार, अंत्यविधीसाठी फक्त ४०० रुपयांत जळावू बिट व बांबू अहेरी शहरात उपलब्ध झाल्याने नागरिकांना मोठी सोय झाली आहे, मागील अनेक वर्षांपासूनची ही मागणी आत्ता पूर्ण झाल्याने लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.त्यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचे आभार मानत समाधन व्यक्त केले आहे.