शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून नालीचे काम अपूर्ण

By admin | Updated: June 15, 2014 23:32 IST

सन २०११-१२ या वर्षात नवीन बसस्थानकासमोरील नालीचे बांधकाम मंजूर करण्यात आले. कंत्राटदाराने सदर काम २०१४ मध्ये सुरू केले. केवळ २० ते २५ मीटर नालीचे बांधकाम करून कंत्राटदाराने काम बंद केले.

आरमोरी : सन २०११-१२ या वर्षात नवीन बसस्थानकासमोरील नालीचे बांधकाम मंजूर करण्यात आले. कंत्राटदाराने सदर काम २०१४ मध्ये सुरू केले. केवळ २० ते २५ मीटर नालीचे बांधकाम करून कंत्राटदाराने काम बंद केले. अधिकारी व कंत्राटदाराच्या दुर्लक्षितपणामुळे नालीचे बांधकाम गेल्या दोन वर्षापासून अपूर्ण आहे.या बांधकामाचे चौकशी करून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी तंटामुक्त समितीचे सदस्य शरद भोयर यांनी केली आहे. या अर्धवट बांधकामाविषयी शरद भोयर यांनी संबंधित कंत्राटदारास विचारणा केली असता, आता पावसाळा सुरू झाल्याने उर्वरित नाली बांधकाम पुढील वर्षी करणार असल्याचे सांगितल्याचे भोयर यांनी म्हटले आहे. या नाली बांधकामासाठी आलेला निधी अभियंता, अधिकारी व कंत्राटदाराने संगनमत करून हडप केल्याचा आरोपही शरद भोयर यांनी केला आहे. सदर नालीचे काम ताडुरवार चौक ते बर्डी टी पार्इंट पर्यंत मंजूर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला करायचे होते. मात्र कंत्राटदाराने रस्त्याच्या एकाच बाजुला केवळ २० ते २५ मीटर नाली बांधकाम केले. उर्वरित नाली बांधकामासाठी त्या ठिकाणी खड्डे खोदून ठेवले आहे. पावसाळ्याच्या दिवसात या खड्ड्यात पाणी साचून नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो, असेही भोयर यांनी म्हटले आहे. नाली बांधकाम पूर्ण करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)