रांगी : रांगी गावाजवळ दुचाकी आणि ट्रॅक्टर यांच्यात धडक होऊन दुचाकीस्वार ठार झाला. या अपघातात एक इसम गंभीररीत्या जखमी झाला आहे. सदर घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. रांगी येथील लिसीट हायस्कूलच्या पुढे धानोरा मार्गावर दुचाकीस्वाराने ट्रॅक्टरला धडक दिली. यात दुचाकीस्वार खुशाल देवाजी पदा (४७) रा. रांगी हा जागीच ठार झाला. तर त्याचा दुसरा सहकारी धनराज संपत मडावी (४५) हा गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्यावर रांगी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. अशोक हलामी रा. कन्हाळगाव यांच्या मालकीचा ट्रॅक्टर एमएच ३३ एफ ३१११ हा रांगीकडून कन्हाळगावकडे जात होता. विरूध्द दिशेने येणाऱ्या एमएच ३३ बी ७०३२ या दुचाकीने ट्रॅक्टरला धडक दिली. इन्कने यांच्या शेताजवळ हा अपघात घडला. मृतकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा आप्त परिवार आहे. (वार्ताहर)
रांगी-खेडी मार्गावर दुचाकीस्वार ठार
By admin | Updated: July 30, 2015 01:15 IST