शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीचा दोन ट्रक झाडू पोहोचला नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:48 IST

गडचिरोली शहरापासून नजीक असलेल्या चामोर्शी मार्गावर कैकाडी समाजाची ५० घरांची वस्ती आहे. या वस्तीमध्ये प्रत्यक्ष जाऊन तेथील महिला व पुरूषांना व्यवसायाबाबत माविमच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर येथे महिला बचत गटाच्या माध्यमातून १ लाख २० हजार रूपयांची गुंतवणूक करून तब्बल दोन ट्रक झाडू नागपुरात पाठवून त्याची विक्री करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसव्वा लाखांची गुंतवणूक : कैकाडी समाजाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरापासून नजीक असलेल्या चामोर्शी मार्गावर कैकाडी समाजाची ५० घरांची वस्ती आहे. या वस्तीमध्ये प्रत्यक्ष जाऊन तेथील महिला व पुरूषांना व्यवसायाबाबत माविमच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर येथे महिला बचत गटाच्या माध्यमातून १ लाख २० हजार रूपयांची गुंतवणूक करून तब्बल दोन ट्रक झाडू नागपुरात पाठवून त्याची विक्री करण्यात आली आहे. माविमच्या पुढाकाराने कैकाडी समाजाच्या या व्यवसायाला उभारी आली असून आता कैकाडी समाजाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू झाली आहे.कैकाडी समाजाच्या वस्तीतील नागरिक सिंदीच्या पानापासून पारंपारिक पध्दतीने झाडू तयार करून विकतात याशिवाय केसाच्या बदल्यात भांडे देणे, भंगार विक्री आदी व्यवसाय करीत असतात. मात्र या व्यवसायातून कैकाडी समाजातील नागरिकांना फारसे उत्पन्न प्राप्त होत नाही. या समाजातील नागरिकांना व्यवसाय व कौशल्याबाबत मार्गदर्शन करून सामुहिकरित्या प्रोत्साहित केल्यास त्यांची आर्थिक संपन्नतेकडे वाटचाल होऊ शकते. हे माविमच्या अधिकाऱ्यांनी ओळखले. त्यानंतर नगर परिषद गडचिरोली व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने कैकाडी समाजाच्या वस्तीला भेट देऊन समाज बांधवांशी चर्चा करण्यात आली. या दरम्यान या कैकाडी वस्तीत तीन गट स्थापन करण्यात आले. मेरी, जय जगन्नाथ व महिमा असे तीन गट स्थापन झाल्यावर त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत प्रती गट १० हजार याप्रमाणे ३० हजार रूपये उपलब्ध करून देण्यात आले. त्यांच्या पारंपारिक झाडू तयार करण्याच्या कलेला चालना देण्यात आली. ३० हजार रूपये गुंतवणुकीवर आठ हजार रूपयांचा शुध्द नफा गटाला मिळाला. त्यानंतर दिवाळी सणाच्या काळात प्रत्येक घरी स्वच्छतेचे काम हाती घेतले जाते. या काळात सिंदीच्या झाडूला मोठी मागणी आहे. शहरी भागातही या झाडूला चांगली पसंती आहे. त्यामुळे कैकाडी समाज वस्तीतील महिलांनी पुन्हा या व्यवसायात गुंतवणूक वाढविण्याचा निर्णय घेतला. ५० हजार रूपये कर्जाचा प्रस्ताव गटाने जिल्हा सहकारी बँकेकडे सादर केल्यानंतर प्रत्येक गटाला ४० हजार रूपयांचे कर्ज मिळाले. तीन गटाचे मिळून १ लाख २० हजारांची गुंतवणूक करून दोन ट्रक झाडू नागपुरला विक्रीसाठी बाजारात पाठविण्यात आले.आणखी दोन गटाची व्यवसायासाठी तयारीगडचिरोलीनजीकच्या कैकाडी वस्तीतील महिला व पुरूषांनी तयार केलेला दोन ट्रक झाडू नागपुरात पाठविल्यानंतर ठोक बाजारात नेण्यात आले. येथे ठोक स्वरूपात गडचिरोलीपेक्षा अधिक भावाने झाडू विकण्यात आला. वाहनभाडे व इतर खर्च वजा करून १० हजार रूपयामागे दोन हजार रूपयांचा निव्वळ नफा या वस्तीतील समाज बांधवांनी मिळविला. व्यवसायातील ही प्रगती पाहून या वस्तीतील आणखी काही महिला पुढे सरसावल्या असून येथे दोन नवे गट स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी महिलांनी तयारी दर्शविली आहे. या गटांना मार्गदर्शन व कर्ज पुरवठा करून व्यवसायात मदत करण्याचे काम माविमच्या जिल्हा समन्वयक कांता मिश्रा यांच्याकडून होणार आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली