शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

गोगावजवळ दोन ट्रकची धडक

By admin | Updated: August 28, 2015 00:06 IST

आरमोरीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने गडचिरोलीकडून जाणाऱ्या ट्रकला गोगाव फाट्याजवळ धडक दिल्याने ट्रकचालक ठार,....

एक जखमी : भिलाई येथील ट्रकचालक जागीच ठारगडचिरोली : आरमोरीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने गडचिरोलीकडून जाणाऱ्या ट्रकला गोगाव फाट्याजवळ धडक दिल्याने ट्रकचालक ठार, तर दुसरा इसम जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली.आरमोरीकडून लोखंड घेऊन येणारा ट्रक रस्त्याच्या मध्यभागातून येत होता, तर गडचिरोलीकडून जाणारा ट्रक डाव्या बाजूने जात होता. मात्र आरमोरीकडून येणाऱ्या ट्रकचालकाने ट्रक वेगाने चालवून दुसऱ्या ट्रकला धडक दिली. यात गडचिरोलीकडून जाणाऱ्या ट्रकचा चालक जागीच ठार झाला, तर दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, आरमोरीकडून येणाऱ्या ट्रकचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. गडचिरोलीकडून आरमोरीकडे जाणाऱ्या सीजी ०७ सी ३८१७ क्रमांकाच्या ट्रकला आरमोरीकडून गडचिरोलीकडे येणाऱ्या एपी २१ वाय १८१८ या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात जोगंदरसिंग प्यारासिंग संधू (५५) रा. भिलाई (छत्तीसगड) हा ट्रकचालक जागीच ठार झाला. तर या अपघातात व्यंकटेश अयय्या वरलू रा. बिदरापाल (छत्तीसगड) हा गंभीररित्या जखमी झाला. त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागपूर-गडचिरोली या मुख्य मार्गावर हा अपघात झाल्याने अडपल्ली, गोगाव, गडचिरोली परिसरातील शेकडो गावकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यामुळे येथे गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)