शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

चितळाची शिकार करणाऱ्या दोन आरोपींना वनकोठडी

By admin | Updated: March 19, 2017 01:51 IST

वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या नवीन वाकडी येथे चितळाची शिकार करणाऱ्या दोन आरोपींना वन विभागाच्या

चामोर्शी : वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या नवीन वाकडी येथे चितळाची शिकार करणाऱ्या दोन आरोपींना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी १५ मार्च रोजी ताब्यात घेतले होते. १६ मार्च रोजी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. राजेंद्र दिलीप सोमनकर, संदीप बाबाजी बारसागडे सर्व रा. नवीन वाकडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. १५ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान गावठी कुत्र्यांनी नर चितळाचा पाठलाग करून चितळाला गावाजवळ आणले. आरोपी राजेंद्र सोमनकर व संदीप बारसागडे यांनी चितळाचा पाठलाग करून वाकडी येथील भिवरूभाई पाल यांच्या शेतात चितळाला ठार केले. त्यानंतर चितळ कापून हिस्से टाकण्याच्या तयारीत असताना वन विभागाचे बी. डी. राठोड घटनास्थळावर पोहोचले. घटनास्थळावर मृत चितळाचे कापलेले मांस, चामडे, पेटी व कापण्याचे व इतर साहित्य आढळून आले. राठोड यांनी याबाबतची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर वन परिक्षेत्राधिकारी चामोर्शी, क्षेत्र सहायक व इतर वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या दोघांविरोधात भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. दोघांनाही न्यायालयाने १९ मार्चपर्यंत वनकोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास वन परिक्षेत्राधिकारी के. आर. धोंडणे करीत आहेत. सदर कारवाई वन परिक्षेत्राधिकारी धोंडणे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक आर. डी. तोकला, बिट वनरक्षक बी. डी. राठोड, वनरक्षक के. ए. वैरागडे, डी. एस. कायते, व्ही. आर. जामुनकर, एन. ए. कुमरे, डी. टी. बोरकर यांनी केली. (शहर प्रतिनिधी)