शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2016 01:04 IST

गडचिरोलीकडून चामोर्शीकडे जाणाऱ्या चामोर्शी पंचायत समितीच्या बोलेरो वाहनाने चामोर्शीवरून तळोधीकडे येणाऱ्या दुचाकीस्वारांना जबर धडक दिली.

घटनास्थळावर तणाव : चामोर्शी पं.स.च्या शासकीय वाहनाने दिली धडकतळोधी (मो.) : गडचिरोलीकडून चामोर्शीकडे जाणाऱ्या चामोर्शी पंचायत समितीच्या बोलेरो वाहनाने चामोर्शीवरून तळोधीकडे येणाऱ्या दुचाकीस्वारांना जबर धडक दिली. या घटनेत दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले. सदर अपघात सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी झाला. घटनेनंतर पोलिसांनी नातेवाईकांना येऊ न देताच रस्त्यावरील मृतदेह उचलून दवाखाण्यात नेले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. नातेवाईकांना आल्याशिवाय व संबंधितांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह उचलू नका, असे नागरिकांचे म्हणणे होते. यावेळी पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार केला. एमएच ३३ सी ०३४६ ही पं.स.ची बोलेरो गडचिरोलीवरून चामोर्शीकडे जात असताना एमएच ३३ एल ४५०३ या विरूध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीला तळोधी जवळील क्रॉसींगवर जोरदार धडक दिली. या घटनेत खोर्दा येथील रहिवासी विलास मोहंदा (४०) व शालिकराम अगणीतवार (५०) हे जागीच ठार झाले. अपघात होताच पंचायत समितीच्या चारचाकी वाहनातील प्रवास करणारे घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर अपघाताची माहिती मिळताच चामोर्शीचे पोलीस उपनिरिक्षक खंडारे, उपनिरिक्षक सुंदरकर, देशमुख, ढोरे, म्हरस्कोल्हे यांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर पडलेले मृततदेह ते दवाखाण्यात हलविले.यावेळी नागरिकांनी हे मृतदेह उचल करण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे पोलीस व नागरिक यांच्यामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. (वार्ताहर)