शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

दोन नगर पंचायती वसुलीत मागे

By admin | Updated: March 13, 2017 01:16 IST

गडचिरोली जिल्ह्यात तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी एकूण १० नगर पंचायती आहेत.

३० टक्क्यांवर गृहकर वसुली : अहेरी, सिरोंचा नगर पंचायतीसमोर उद्दिष्ट गाठण्याचे आव्हान गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी एकूण १० नगर पंचायती आहेत. या १० पैकी अहेरी व सिरोंचा या दोन नगर पंचायतींची सन २०१६-१७ या वर्षात गृहकर वसुली ३० टक्क्याच्या आसपास आहे. इतर आठ नगर पंचायतीची वसुली ४५ टक्क्यांच्या वर आहे. गृहकर वसुलीत अहेरी व सिरोंचा या दोन नगर पंचायती माघारल्या असल्याचे दिसून येत आहे. आरमोरी नगर पंचायतीची जुनी थकीत गृह कराची मागणी ७१ लाख ३७ हजार ८५४ व चालू वर्षाची ७१ लाख ९९ हजार ८८९ अशी एकूण १ कोटी ४३ लाख ३७ हजार ७०३ रूपये आहे. यापैकी सदर नगर पंचायत प्रशासनाने फेब्रुवारी २०१७ अखेरपर्यंत ५३ लाख ७० हजार ९२४ रूपयांची गृह कर वसुली केली. या कर वसुलीची टक्केवारी ३७.४३ आहे. कुरखेडा नगर पंचायतीची जुनी थकीत ६ लाख ४ हजार ९४१ रूपये व चालू वर्षाची ६ लाख ६६ हजार ८१५ रूपये असे एकूण १२ लाख ७१ हजार ७५६ रूपयांची मागणी आहे. यापैकी नगर परिषद प्रशासनाने ५ लाख ७२ हजार ४८० रूपयांची कर वसुली केली असून या वसुलीची टक्केवारी ४५.०१ आहे. कोरची नगर पंचायतीची शहर वासीयांकडे जुनी थकीत २ लाख ५४ हजार ३१२ व चालू वर्षाची ४ लाख ४ हजार ११९ अशी एकूण ६ लाख ५८ हजार ४३१ रूपयांची मागणी होती. यापैकी नगर पंचायतीने ३ लाख ५ हजार २७६ रूपयांची कर वसुली फेब्रुवारी अखेरपर्यंत केली. या कर वसुलीची टक्केवारी ४५.६७ आहे. धानोरा नगर पंचायतीची जुनी थकीत ५ लाख ३६ हजार ९५१ व चालू वर्षाची ६ लाख ५० हजार ८६८ अशी एकूण ११ लाख ८७ हजार ८१९ रूपयांची गृह कराची मागणी होती. यापैकी धानोरा न.पं.ने ४ लाख ८४ हजार ३२० रूपये कर वसुली फेब्रुवारी अखेरपर्यंत केली. या कर वसुलीची टक्केवारी ४०.७७ आहे. चामोर्शी नगर पंचायतीची जुनी थकीत ३१ लाख ६४ हजार ५७८ व चालू वर्षाची ३४ लाख ६० हजार ९०५ अशी एकूण ६६ लाख २५ हजार ४८३ रूपयांची गृह कर मागणी होती. यापैकी न.पं.ने फेब्रुवारी अखेरपर्यंत ३९ लाख १७ हजार १८८ रूपयांची कर वसुली केली. या वसुलीची टक्केवारी ५९.१२ आहे. मुलचेरा नगर पंचायतीची जुनी थकीत २१ हजार १३० व चालू वर्षाची २ लाख ६८ हजार १०२ अशी एकूण २ लाख ८९ हजार २३२ रूपयांची गृहकर मागणी होती. यापैकी न.पं.ने १ लाख २८ हजार ८९५ रूपयांची वसुली केली. सदर गृहकर वसुलीची टक्केवारी ४४.५६ आहे. एटापल्ली नगर पंचायतीची जुनी थकीत ९ लाख ९८ हजार १२९ व चालू वर्षाची १० लाख ८७ हजार ११३ अशी एकूण २० लाख ८५ हजार २४२ रूपये गृहकर मागणी होती. यापैकी न.पं.ने ८ लाख ५५ हजार ८८० रूपयांची गृहकर वसुली केली असून याची टक्केवारी ४१.०४ आहे. भामरागड नगर पंचायतीची जुनी थकीत ३ लाख ८९ हजार ३१५ व चालू वर्षाची ४ लाख १६ हजार ८३५ अशी एकूण ८ लाख ६ हजार १५० रूपये गृहकर मागणी होती. यापैकी न.पं.ने फेब्रुवारी अखेरपर्यंत ३ लाख २९ हजार ७६९ रूपयाची गृहकर वसुली केली असून याची टक्केवारी ४०.९१ आहे. अहेरी व सिरोंचा नगर पंचायती गृहकर वसुलीत पिछाडीवर आहेत. अहेरी नगर पंचायतीची जुनी थकीत ४५ लाख ५४ हजार ६०१ व चालू वर्षाची ३६ लाख २० हजार ३३५ अशी एकूण ८१ लाख ७४ हजार ९३६ रूपये गृहकर मागणी होती. यापैकी न.पं.ने फेब्रुवारी अखेरपर्यंत २१ लाख २५ हजार ६५६ रूपये गृहकर वसुली केली असून याची टक्केवारी २६ आहे. तर सिरोंचा नगर पंचायतीची जुनी थकीत १८ लाख ९८ हजार ९११ व चालू वर्षाची १४ लाख १३ हजार ७३४ अशी एकूण ३३ लाख १२ हजार ६४५ रूपये गृहकराची मागणी होती. यापैकी न.पं.ने केवळ ९ लाख ८१ हजार २८५ रूपये गृहकर वसुली फेब्रुवारीअखेरपर्यंत केली. या कर वसुलीची टक्केवारी २९.६२ आहे. (स्थानिक प्रतिनिधी) रिक्त पदाची समस्या कायमच २३ एप्रिल २०१५ च्या निर्णयानुसार शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील १० तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा दिला. या नगर पंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, धानोरा नगर पंचायतीत मनुष्यबळ कमी असल्याने त्याचा परिणाम गृह व पाणी कर वसुलीवर होत आहे. अनेक नगर पंचायतीत मुख्याधिकारीही प्रभारी आहेत. रिक्त पदांमुळे नगर पंचायतीच्या प्रशासकीय कामकाजाची गती कमी आहे.