शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यातच उखडले सिमेंटचे रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:49 IST

आरमोरी शहरात नगर पंचायतींतर्गत अंतर्गत रस्ते, नाली बांधकाम, रस्त्याचे खडीकरण आदी कामे हाती घेण्यात आली. परंतु सदर कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत.

ठळक मुद्देआरमोरीतील अंतर्गत रस्ते : अधिकारी, अभियंता व कंत्राटदारावर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी शहरात नगर पंचायतींतर्गत अंतर्गत रस्ते, नाली बांधकाम, रस्त्याचे खडीकरण आदी कामे हाती घेण्यात आली. परंतु सदर कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. दोन ते तीन महिन्यातच सिमेंट रस्ते उखडले असून या कामांची चौकशी करून संबंधित अधिकारी, कंत्राटदार व अभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.आरमोरी नगर पंचायतीची सत्ता २४ एप्रिल २०१५ पासून प्रशासकाच्या हाती आहे. नगर पंचायतीला प्राप्त होणाऱ्या निधीची विल्हेवाट प्रशासकांच्या माध्यमातून लावली जाते. अनेक विकास कामे शहरात केली जात आहेत. परंतु ती कामे योग्य प्रकारे होत नसून विकास कामांवरच गालबोट लागत आहे. महाराष्ट्र नगरोत्थान योजना, दलित वस्ती सुधार योजना, रस्ते अनुदान निधी, चौदावा वित्त आयोग आदी योजनांतून प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त होतो. परंतु निधीची विल्हेवाट लावताना गरज असेल तिथे सिमेंट रस्ता व नाल्यांचे बांधकाम करणे आवश्यक आहे. मात्र नगर पंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हाती असल्याने कोणत्या ठिकाणी रस्ते, नाल्यांचे बांधकाम करावे, याबद्दल सामंजस्याचा अभाव असल्याचे दिसून येते. प्रशासक, अधिकारी, कंत्राटदार संगनमत करून निकृष्ट दर्जाचे रस्ते शहरात बांधत आहेत.अनेक ठिकाणी अत्यल्प सिमेंट, गिट्टीचा वापर केला जात आहे. तसेच कोपिंग न करणे, खडीकरण न करताच रस्त्याचे बांधकाम करणे यासह विविध कामे शहरात सुरू आहेत. ११ आॅगस्ट २०१७ ला उमाजी डोकरे यांच्या घरापासून अरविंद तितीरमारे यांच्या घरापर्यंत बांधून तयार झालेला रस्ता महिनाभरातच उखडला. अत्यल्प सिमेंटचा वापर करून रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे अल्पावधीतच रस्त्याची दुर्दशा झाली. सदर रस्ता ७० मीटर लांब, ३.७५ मीटर रूंद आहे. ५ लाख १५ हजार रूपयांचा खर्च करून रस्त्याचे बांधकाम करायचे होते. मात्र संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले आहे, असा आरोप नागरिकांनी करीत या बांधकामांची चौकशी करून प्रशासकीय अधिकारी, कंत्राटदार व अभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पंकज सपाटे, उमाजी डोकरे, प्रकाश श्रीरामे, अरविंद तितीरमारे, दामोधर नारनवरे, विठोबा तोरणकर यांनी केली आहे.मागणी नसतानाही बांधकामआरमोरी नगर पंचायतीने शहरातील काही भागात सिमेंट रस्त्यांचे बांधकाम केले आहे. यातील अनेक रस्त्यांवर लोकवस्ती अतिशय विरळ आहे. विशेष म्हणजे या भागातील कोणत्याच नागरिकांनी सिमेंट रस्त्याच्या बांधकामाची मागणी केली नाही. तरी सुद्धा प्रशासनाच्या वतीने सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. याबाबीला नगर पंचायतीने दुजोरा दिला आहे.