शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कारमधून २ लाख ८८ हजार रूपयांची देशी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 22:14 IST

दारूबंदी असलेल्या गडचिरोलीत ‘थर्टी फर्स्ट’साठी चोरट्या मार्गाने दारूची आयात सुरू झाली आहे. अशाच एका कारमधून शहरात आलेल्या दारूला उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने सापळा रचून पकडले. त्यातील २ लाख ८८ हजार रुपयांची दारू व ४ लाख ५० हजार रुपयांचे वाहन आणि इतर साहित्य असा एकूण ७ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई सर्वोदय वॉर्डातील बेसिक शाळेजवळ सोमवारी करण्यात आली.

ठळक मुद्दे‘थर्टी फर्स्ट’ची तयारी : गडचिरोली एसडीपीओ पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोलीत ‘थर्टी फर्स्ट’साठी चोरट्या मार्गाने दारूची आयात सुरू झाली आहे. अशाच एका कारमधून शहरात आलेल्या दारूला उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने सापळा रचून पकडले. त्यातील २ लाख ८८ हजार रुपयांची दारू व ४ लाख ५० हजार रुपयांचे वाहन आणि इतर साहित्य असा एकूण ७ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई सर्वोदय वॉर्डातील बेसिक शाळेजवळ सोमवारी करण्यात आली.गडचिरोली शहरात दारू आणली जात असल्याची गोपनिय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांना प्राप्त झाली. त्यामुळे त्यांच्या पथकातील हवालदार हरीदास राऊत, नापोशि थामदेव कोहपरे यांनी बेसीक शाळेजवळ सापळा रचला. एमएच ४८ ए ५४२० क्रमांकाच्या कारची तपासणी केली असता वाहनात सुमारे ३६ देशी दारूचे बॉक्स आढळून आले. त्यामध्ये एकूण ३ हजार ६०० सीलबंद निपा होत्या. त्याची एकूण किंमत २ लाख ८८ हजार रुपये आहे. १६ हजार किमतीचे चार मोबाईलसुध्दा वाहनात आढळले.पोलीस आल्याची चाहूल लागताच वाहन चालक व वाहनातील इतर दोघांनी वाहन ठेवून पळ काढला. पोलिसांनी माहिती काढली असता, मोहसीन अली, अमिर खान, शैलेश रापल्लीवार रा. रामनगर गडचिरोली हे वाहनात होते, अशी माहिती त्यांना प्राप्त झाली. या तिघांविरोधात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित पार्ट्यांसाठी मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होते. ही बाब लक्षात घेऊन दारू पुरवठादारांनी शहरात दारू आणली होती. मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न हाणून पडला. या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.