शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख पाठ्यपुस्तके पोहोचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2016 01:39 IST

सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद, अनुदानित व शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या ...

पहिल्या टप्प्यात : इयता पहिली ते आठवीच्या १ लाख २१ हजार विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तकेगडचिरोली : सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद, अनुदानित व शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरीत करण्याची योजना राबविली जात आहे. याअनुषंगाने जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. गडचिरोली, चामोर्शी व अहेरी या तीन तालुक्याच्या गटसाधन केंद्रात पहिल्या टप्प्यात आतापर्यंत २ लाख ३३ हजार पाठ्यपुस्तके पोहोचली आहेत. जिल्हा परिषद व नगर परिषद शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या कायम राखण्याच्या उद्देशाने शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहे. यामध्ये मोफत पाठ्यपुस्तके वितरण, गणेवश व इतर योजनांचा समावेश आहे. रविवारी चामोर्शी तालुक्याच्या गटसाधन केंद्रात इयत्ता पहिली ते आठवीचे मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमांचे मिळून ७६ हजार पाठ्यपुस्तके पोहोचली. अहेरी तालुक्यासाठी येथील गटसाधन केंद्रात ७७ हजार तर गडचिरोली येथील गट साधन केंद्रात ८० हजार पाठ्यपुस्तके मंगळवारी पोहोचली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी २६ जूनला पुस्तके मिळण्याबाबत नियोजन करण्यात येते. शैक्षणिक सत्र २०१६-१७ मध्ये जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील एकूण १ लाख २१ हजार ६८७ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मंगळवारी गडचिरोली येथील गटसाधन केंद्रात गडचिरोली तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके घेऊन ट्रक पोहोचला. यावेळी जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी उकंडराव राऊत यांनी गटसाधन केंद्राला भेट देऊन पाठ्यपुस्तकाची पाहणी केली. शाळेच्या पहिल्या दिवशी जि.प., न.प. व अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)मे अखेरपर्यंत सर्व तालुक्यांत पुस्तके पोहोचणार अहेरी, गडचिरोली व चामोर्शी या तीन तालुक्याच्या ठिकाणी पाठ्यपुस्तके पोहोचली आहेत. उर्वरित धानोरा, देसाईगंज, आरमोरी कोरची, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा व मुलचेरा या सात तालुक्याच्या गटसाधन केंद्रात ३१ मे पर्यंत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके पोहोचणार आहेत, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी उकंडराव राऊत यांनी लोकमतशी बोलताना दिली. २,५०९ विद्यार्थ्यांना बंगाली माध्यमांचे पुस्तके मिळणारसर्व शिक्षा अभियानांतर्गत शासनाकडून बंगाली माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बंगाली माध्यमांचे पाठ्यपुस्तके उपलब्ध होत नाही. गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील जि.प. शाळांमध्ये बंगाली माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या १ हजार ३६९ आहे. मुलचेरा तालुक्यातील एकूण १ हजार १४० विद्यार्थी इयत्ता पहिली ते चौथीचे शिक्षण बंगाली माध्यमातून घेत आहे. जि.प. शिक्षण विभागाच्या वतीने बंगाली माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या एकूण २ हजार ७०९ विद्यार्थ्यांसाठी बंगाली भाषेतील पाठ्यपुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. त्यानंतर सदर पुस्तके संबंधित विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे.