शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-कारच्या अपघातात दोन ठार

By admin | Updated: December 28, 2015 01:36 IST

भरधाव ट्रक व कारची समोरासमोर धडक बसल्याने एक जण जागीच ठार तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यू झाला.

पिता-पुत्र गंभीर जखमी : देसाईगंज-लाखांदूर मार्गावरील सावंगीनजीकची घटनादेसाईगंज : भरधाव ट्रक व कारची समोरासमोर धडक बसल्याने एक जण जागीच ठार तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यू झाला. तर या अपघातातील कारमधील दोघे पिता-पुत्र गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना देसाईगंज-लाखांदूर मार्गावर सावंगीनजीक रविवारी सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास घडली. कांचन राऊत (४१), रा. ब्रह्मपुरी असे जागीच ठार झालेल्या इसमाचे नाव आहे तर राजेश माधव उरकुडे (४०) रा. ब्रह्मपुरी यांचा उपचारादरम्यान देसाईगंजच्या ग्रामीण रूग्णालयात मृत्यू झाला. विनायक किसन देवतळे (६५), गोकुळ विनायक देवतळे (३१) रा. चंद्रपूर हे दोघे गंभीर जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार, विनायक देवतळे यांच्यासह चौघे जण एमएच ३४ एएम ३६७७ या कारने लाखांदूर तालुक्यात गोकुलला लग्नासाठी मुलगी बघायला जात होते. दरम्यान लाखांदूरकडून येणाऱ्या एमएच ३४ एबी १४९१ या भरधाव ट्रकने कारला धडक दिली. या अपघातात कारमधील कांचन राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. तर राजेश उरकुडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या विनायक देवतळे व गोकुल देवतळे या दोघे पिता-पूत्रांना देसाईगंजच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. राजेश उरकुडे हे कार चालवित होते. धडक इतकी भीषण होती की, अनियंत्रित ट्रक लगतच्या शेतात २०० फूट अंतरावर पडला. तर कार समोरून प्रचंड क्षतिग्रस्त झाली आहे. या घटनेचा पुढील तपास देसाईगंज पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)