शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

दोन अभियंत्यासह सहायक लेखाधिकाऱ्यांना खोलीत डांबले

By admin | Updated: July 27, 2016 01:33 IST

जि.प. शाळांमधील स्वच्छतागृहाच्या प्रलंबित देयकावरून कंत्राटदाराकडून मुख्याध्यापकास मारहाण झाल्याची घटना घडली.

मुलचेरातील घटना : मुख्याध्यापक मारहाण प्रकरणाचे पडसाद मुलचेरा : जि.प. शाळांमधील स्वच्छतागृहाच्या प्रलंबित देयकावरून कंत्राटदाराकडून मुख्याध्यापकास मारहाण झाल्याची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा मुख्यालयातून सर्व शिक्षा अभियानात कार्यरत अभियंत्याची चमू सहायक लेखाधिकाऱ्यांना घेऊन मुलचेरा पंचायत समितीत स्वच्छतागृह प्रलंबित देयकाची माहिती घेण्यासाठी गेली होती. दरम्यान संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा मुलचेराचे पदाधिकारी व काही शिक्षकांनी जिल्हा अभियंता, तालुका अभियंत्यासह सहायक लेखाधिकाऱ्यांना खोलीत डांबल्याची घटना मंगळवारी मुलचेरा येथे घडली. सर्व शिक्षा अभियानात कार्यरत जिल्हा अभियंता रवींद्र भरडकर, मुलचेरा तालुका अभियंता आयलावार व सहायक लेखाधिकारी विजया मरते हे तिघे जण स्वच्छतागृहाच्या कामाबाबतचे प्रलंबित देयकाची माहिती घेण्यासाठी मुलचेरा पंचायत समितीत गेले होते. या ठिकाणी शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित झाले. यावेळी चमूतील अधिकाऱ्यांनी या पदाधिकाऱ्यांशी प्रलंबित देयकासंदर्भात चर्चा करण्याचे ठरविले व तसा प्रयत्नही केला. मात्र आधी स्वच्छतागृह कामाची रक्कम द्या, त्यानंतर चर्चा करा, अशी घोषणा करून चमूतील तिघांना खोलीत डांबले. स्वच्छतागृहाच्या कामाची उर्वरित रक्कम दिल्याशिवाय तुम्हााला सोडणार नाही, शिक्षकांवर होणारी मारहाण खपवून घेणार नाही, असे मुलचेरा तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट बजाविले. त्यानंतर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती शाखा मुलचेराच्या वतीने तहसीलदार व सहायक पोलीस निरिक्षकांमार्फत मंगळवारी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे मागण्यांचे निवेदन पाठविले. (शहर प्रतिनिधी) शिक्षिका सडमेक हल्ला प्रकरणाची चौकशी करा जि.प. शाळेच्या शिक्षिका छाया सडमेक यांच्यावर काही इसमांनी हल्ला चढवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात सदर शिक्षीकेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र त्या आरोपींवर कारवाई न करता त्यांना सोडण्यात आले. त्यामुळे सदर हल्ला प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षक समिती मुलचेराच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. कारवाई न केल्यास शिक्षकांना शस्त्रे पुरवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.