शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दोन तोतया नक्षलवाद्यांना दोन दिवसांचा पीसीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2017 01:08 IST

धानोरा तालुक्यातील येरकड पोलीस मदत केंद्राच्या हद्दित येणाऱ्या जपतलाई या गावातून ग्रामस्थांकडून

जपतलाई येथील प्रकार : तेंदू संकलनाचे मागितले पैसेलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धानोरा तालुक्यातील येरकड पोलीस मदत केंद्राच्या हद्दित येणाऱ्या जपतलाई या गावातून ग्रामस्थांकडून नक्षल्यांच्या नावावर खंडणी मागणाऱ्या ‘त्या’ दोन तोतया नक्षलवाद्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. भिसारू गोटा व साहेबराव कुजूर असे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या तोतया नक्षलवाद्यांचे नाव आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भिसारू गोटा व साहेबराव कुजूर हे दोघे जण मंगळवारी जपतलाई गावात गेले. तेथे किशोर बाबुराव हलामी हे तेंदू संकलनाच्या मजुरीचे पैसे लोकांना वाटत होते. दरम्यान किशोर हलामी यांच्याजवळ जाऊन या दोन तोतया नक्षलवाद्यांनी ‘आम्हाला नक्षलवाद्यांनी पाठविले आहेत. वाटप करीत असलेल्या तेंदू संकलनाच्या पैशातून १० हजार रूपये दे, नाही तर तुला याच ठिकाणी जीवानिशी मारून टाकू’, अशी धमकी हलामी यांना दिली. यावर सदर पैसे हे लोकांचे असल्याने ते तुम्हाला द्यावयाचे की नाही याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करून उद्या सकाळी सांगतो, असे हलामी यांनी तोतया नक्षलवाद्यांना सांगितले. तेंदू संकलनाच्या मजुरीचे पैसे हे कष्टाचे असल्याने त्यांना न देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. दुसऱ्या दिवशी बुधवारला ग्रामस्थांनी या दोन तोतया नक्षलवाद्यांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी या दोघांवर धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास येरकड पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरिक्षक किरण वराळ करीत आहेत. यापूर्वीही नक्षल्यांना पुरविण्यात येणारी रसद पोलिसांनी पकडली होती. सदर रक्कम ही तेंदू संकलन करणाऱ्या मजुराच्या मजुरीची होती. खंडणीचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात वाढले असल्याचे दिसून येते.