शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन नामांकनाला दोन दिवस मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:58 IST

जिल्ह्यात होऊन घातलेल्या १६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि २०७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची मुदत दोन दिवसांनी वाढविण्यात आली.

ठळक मुद्देमतदान २५ ऐवजी २७ ला : आतापर्यंत ८२ अर्ज

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्ह्यात होऊन घातलेल्या १६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि २०७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची मुदत दोन दिवसांनी वाढविण्यात आली. त्यामुळे दि.१२ फेब्रुवारीला सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत आॅनलाईन नामांकन स्वीकारले जाणार आहेत. याशिवाय मतदान २५ ऐवजी २७ फेब्रुवारीला होणार आहे.आॅनलाईन नामांकन दाखल करताना ग्रामीण भागात येत असलेल्या अडचणी विचारात घेऊन निवडणूक आयोगाने हा बदल केला आहे. दोन दिवसांपूर्वीच ‘लोकमत’ने हा मुद्दा प्रकर्षाने मांडून अनेक इच्छुक उमेदवारांवर निवडणूक लढण्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते हे निदर्शनास आणले होते हे विशेष.सुधारित कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रांची छाननी दि.१४ ला सकाळी ११ वाजतापासून होणार आहे. त्यानंतर नामांकन मागे घेण्यासाठी दि.१६ ला दुपारी ३ पर्यंतची वेळ दिली आहे. मतदान दि.२७ ला सकाळी ७.३० पासून दुपारी ३ वाजेपर्यंत करता येणार आहे. दि. मतमोजणी दि.२८ ला संबंधित तालुका मुख्यालयी होईल.जिल्ह्यात पोटनिवडणूक होत असलेल्या २०७ ग्रामपंचायतींमध्ये सदस्या व सरपंचांची ५१९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक जण या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असले तरी आॅनलाईन नामांकन दाखल करण्यासाठी ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा नाही. तालुकास्थळीही इंटरनेटची गती अतिशय मंद राहात आहे. त्यामुळे नामांकन दाखल करणे अडचणीचे जात आहे. तब्बल साडेपाचशे पेक्षा जास्त पदांसाठी ही निवडणूक असताना पाच दिवसात केवल ८२ उमेदवारांचे नामांकन निवडणूक विभागाच्या पोर्टलवर आले होते. यावरून स्थितीची कल्पना येते.राखीव जागेसाठी नामांकन भरताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट शिथिल करण्यात आल्याने उमेदवारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तरीही इंटरनेट समस्येचा खोळंबा कायम आहे.