शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दोन स्वस्त धान्य दुकानदारांचा सत्कार

By admin | Updated: January 31, 2017 02:07 IST

पुरवठा विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील अडपल्ली येथील के. एन. सालोटकर व गोकुलनगर

ई-पॉज मशीनचा यशस्वी वापर : प्रधान सचिवांनी केला गौरव गडचिरोली : पुरवठा विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील अडपल्ली येथील के. एन. सालोटकर व गोकुलनगर येथील एन. पी. वैद्यवार या दोन स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉज मशीन देण्यात आल्या आहेत. त्यांनी यशस्वीरित्या या मशीनचा वापर केल्याबद्दल नागपूर येथील आढावा बैठकीदरम्यान त्यांचा राज्याच्या अन्न पुरवठा विभागाचे प्रधानसचिव महेश पाठक यांंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अन्न, धान्याच्या पारदर्शक वितरणासाठी तसेच रोखरहित महाराष्ट्र निर्मितीसाठी पुरवठा विभागाच्या वतीने राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉज मशीन वितरित केले आहेत. याचा आढावा नागपूर येथील बचत भवनात २८ जानेवारी रोजी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी घेतला. या कार्यक्रमादरम्यान सालोटकर व वैद्यवार यांचा सत्कार करण्यात आला. राज्यभरात ८४ स्वस्त धान्य दुकानामध्ये ई-पॉज मशीन बसविण्यात आले आहेत. तर ६४ ठिकाणी ई-पॉज मशीन बसविण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पाठक यांनी दिली. बैठकीला पुरठा विभागाचे उपायुक्त रमेश आडे, गडचिरोली जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. चांदूरकर उपस्थित होते. ई-पॉज मशीन ट्रान्जेक्शनबेस्ट मॉडेल असल्यामुळे उचल करण्यात आलेला साठा व वितरणात हेराफेरी करता येत नाही. या मशीनच्या सहाय्याने दुकानदारांना सुलभतेने अन्नधान्याचे वितरण व त्याचा हिशोब ठेवता येईल, असे पाठक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)