शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकराचे मांस विकणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:02 IST

रानडुकराची शिकार करून त्याचे मांस विक्रीसाठी गडचिरोली शहरात आणले जात असताना वन विभागाच्या कर्मचाºयांनी पोटेगाव मार्गावर सापळा रचून दोन आरोपींना मासांसह अटक केली आहे. सदर कारवाई रविवारी करण्यात आली.

ठळक मुद्देगडचिरोली येथे कारवाई : सावली तालुक्यातील निफंद्रा जंगलात केली शिकार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रानडुकराची शिकार करून त्याचे मांस विक्रीसाठी गडचिरोली शहरात आणले जात असताना वन विभागाच्या कर्मचाºयांनी पोटेगाव मार्गावर सापळा रचून दोन आरोपींना मासांसह अटक केली आहे. सदर कारवाई रविवारी करण्यात आली.प्रशांत वासुदेव भैसारे (२७), सदाशिव जनार्धन वेलादी (४५) दोघेही रा. आंबेशिवणी अशी आरोपींची नावे आहेत. सावली तालुक्यातील निफंद्रा येथील जंगलात रानडुकराची शिकार करून त्याचे मांस गडचिरोली येथे आणले जात असल्याची गोपनीय माहिती वनाधिकारी यांना प्राप्त झाली. त्यानुसार वन कर्मचाºयांनी पोटेगाव मार्गावर सापळा रचला व आरोपींची तपासणी केली असता, त्यांच्याकडे रानडुकराचे सात किलो मांस आढळून आले. त्यांची चौकशी केली असता, सदर मांस गडचिरोली येथे विक्रीसाठी आणले असल्याचे सांगितले. सदर कारवाई सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्राधिकारी दिलीप कैलुके, वनरक्षक बी. पी. राठोड, आर. के. चव्हाण, के. व्ही. मुनघाटे, डी. एस. धुर्वे यांनी केली. दोन्ही आरोपींना वनक्षेत्र सहायक पाथरी यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.