गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी आणि कुरखेडा येथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकून दोन व्यापा-यांकडून अडीच लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त केला. यापैकी एक व्यापारी तंबाखूचा मोठा डीलर आहे, तर दुसºयाने स्वीट मार्टच्या गोदामात ही तंबाखू लपवून ठेवला होता.आरमोरी शहरातील सराफा लाइनजवळील गोदामात स्वीट मार्ट व्यापारी गणेश खेमराज खोब्रागडे याने २ लाख ३८ हजार ६४० रुपये किमतीची ५३४ किलो सुगंधित तंबाखू लपवून ठेवला होता.तसेच कुरखेडा येथील क्रिष्णा किराणा स्टोअर्सचे मालक राजकुमार जौकमल रामचंदानी याने १२हजार १४० रुपये किमतीचा १७.२ किलो सुगंधित तंबाखू, तसेच १८ हजार २४० रुपये किमतीची ४८ किलो खराब सुपारी लपवून ठेवली होती. कारवाईत हा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अडीच लाखांचा सुगंधी तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 04:57 IST