शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

अडीच कोटी आले, जागा मिळेना!

By admin | Updated: November 3, 2014 23:24 IST

नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सुविधा निर्माण व्हावी, या हेतुने शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत अडीच वर्षांपूर्वी गडचिरोली येथे

मॉडेल कॉलेजची व्यथा : भाड्याच्या जागेवर दोन खोल्यांमध्ये सुरू आहे अध्यापनाचे कामदिलीप दहेलकर - गडचिरोलीनक्षलग्रस्त, आदिवासीबहुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सुविधा निर्माण व्हावी, या हेतुने शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत अडीच वर्षांपूर्वी गडचिरोली येथे मॉडेल कॉलेज सुरू केले. सुरूवातीला रातूम नागपूर विद्यापीठांतर्गत असलेल्या उपकेंद्राच्या इमारतीमध्ये सदर मॉडेल कॉलेज सुरू करण्यात आले. या मॉडेल कॉलेजच्या इमारतीच्या बांधकामासाठी रातूम विद्यापीठाला शासनाकडून अडीच कोटी रूपयाचा निधी दोन वर्षांपूर्वी प्राप्त झाला आहे. मात्र जागेअभावी सदर मॉडेल कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम रखडले आहे.गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शासनाने २०११ मध्ये गडचिरोली येथे मॉडेल कॉलेजला मान्यता प्रदान केली. त्यानंतर १ जुलै २०११ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या इमारतीत सदर मॉडेल कॉलेज सुरू करण्यात आले. मॉडेल कॉलेज सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षी बी.ए., बी.कॉम, बी.बी.ए. आदी अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करण्यात आले. दुसऱ्या वर्षी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी पटसंख्येत वाढ झाली. सन २०१३-१४ गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाकडून रातूम नागपूर विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या इमारतीत असलेल्या मॉडेल कॉलेजला कुलूप ठोकण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सदर मॉडेल कॉलेज बंद झाल्याचा संदेश जाऊन यंदा या मॉडेल कॉलेजमध्ये फार कमी प्रवेश झाले असल्याची माहिती आहे. त्यानंतर एकाच खोलीमध्ये सदर मॉडेल कॉलेज सुरू होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या प्रशासनात सदर मॉडेल कॉलेजच्या मालकी हक्कावरून गेल्या दोन-तीन वर्षांपासून शीतयुध्द सुरू आहे. सद्यस्थितीत मॉडेल कॉलेज आरमोरी मार्गावर गोगावनजीक असलेल्या खासगी शिक्षण संस्थेच्या इमारतीत भाडे तत्वावर सुरू आहे. बरेच प्रयत्न करूनही मॉडेल कॉलेज हस्तांतरित करण्यात गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाला अपयश आले. मॉडेल कॉलेजच्या इमारतीच्या बांधकामासाठी आठ कोटी रूपयांची तरतूद शासनाने केली आहे. यापैकी इमारत बांधकामासाठी रातूम विद्यापीठाला अडीच कोटी रूपये मिळाले आहेत.जागा शोधण्याच्या हालचालीला गतीशासनाने सर्व सोयीसुविधायुक्त प्रशस्त मॉडेल कॉलेजची संकल्पना गडचिरोली येथे साकार करण्याचे नियोजन केले. या कॉलेजमध्ये मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान, शौचालय, वाहनतळ, उपाहारगृह आदींचा समावेश नियोजनात आहे. सदर मॉडेल कॉलेजला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी शासनाने या कॉलेजसाठी आठ कोटी रूपयाची तरतूद केली. यापैकी अडीच कोटी रूपयांचा निधी रातूम नागपूर विद्यापीठाला अडीच वर्षांपूर्वी दिला आहे. जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्याकडे गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू पद आल्यावर त्यांनी स्वत: या कॉलेजचे स्वतंत्र अस्तित्व राहावे यासाठी पुढाकार घेतला. काही दिवसांपूर्वी खरपुंडी गावानजीकच्या सहा एकर जागेची मॉडेल कॉलेजच्या इमारतीसाठी पाहणी केली होती. प्रशासनाकडून जागा शोधण्याच्या हालचालीला गती आली आहे.