शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बामणीत २४ जोडपे अडकले लग्नाच्या बेडीत

By admin | Updated: March 10, 2016 01:58 IST

पोलीस विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सिरोंचा तालुक्यातील बामणी येथे जनजागरण मेळावा घेण्यात आला.

५० गॅसचे वाटप : पाच लाखांच्या निधीतून अनेकांना दिला लाभबामणी : पोलीस विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सिरोंचा तालुक्यातील बामणी येथे जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात २४ जोडप्यांचा सामूहिक विवाह लावण्यात आला. तसेच शासनाच्या विविध विभागातर्फे पाच लाखांच्या निधीतून विविध साहित्याचे वाटप परिसरातील नागरिकांना करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन अहेरी आदिवासी विकास प्रकल्पाचे वरिष्ठ आदिवासी निरीक्षक मट्टामी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बामणी उपपोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आशिष चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून बामणीचे वनपाल विशाल सालकर, पोलीस उपनिरीक्षक भोंगाडे, बांधकाम विभाग सिरोंचाचे कार्यकारी अभियंता एन. एम. पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद गायकवाड, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक खोब्रागडे आदींसह सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विवाहबद्ध झालेल्या २४ जोडप्यांना प्रत्येकी १० हजार रूपयांचा धनादेश प्रकल्प अधिकारी यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच वन विभागामार्फत ५० एलपीजी गॅस कनेक्शन व ३५ वॉटर फिल्टर नागरिकांना वितरित करण्यात आले. व्हॉलिबॉल स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या संघांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या मेळाव्याला ७०० नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक उमेश भोंगाडे, संचालन संदीप टोंगलवार तर आभार विनोद गेडाम, नईम शेख यांनी मानले. (वार्ताहर)