शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीव गणना अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 22:58 IST

वैशाख पौर्णिमेच्या रात्री सर्वाधिक प्रकाश राहत असल्याने यादिवशी वनविभागाच्या मार्फत पाणवठ्यांजवळ वन्यजीवांची गणना केली जाते. मात्र पाणवठेच आटल्याने वन्यजीव पाणवठ्यांकडे फिरकणार नाही. परिणामी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी होणारी गणना अडचणीत आली आहे.

ठळक मुद्देपाणवठे आटले : वैशाख पौर्णिमेच्या दिवशी केली जाते मोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वैशाख पौर्णिमेच्या रात्री सर्वाधिक प्रकाश राहत असल्याने यादिवशी वनविभागाच्या मार्फत पाणवठ्यांजवळ वन्यजीवांची गणना केली जाते. मात्र पाणवठेच आटल्याने वन्यजीव पाणवठ्यांकडे फिरकणार नाही. परिणामी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी होणारी गणना अडचणीत आली आहे.मोहफुलांचा हंगाम सुरू झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात जंगलांना आगी लागण्यास सुरुवात होते. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे गवत सुकले होते. परिणामी जंगलांना लागणाऱ्या आगीमध्ये वाढ झाली आहे. जंगलातील पाणवठे आटल्यानंतर वन्यजीव गावाजवळच्या तलावात पाणी पिण्यासाठी येतात. मात्र यावर्षी तलावातील पूर्ण पाणी शेतीसाठी वापरल्या गेल्याने बहुतांश तलाव कोरडे पडले आहेत. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी वनविभागाच्या मार्फत पाणवठ्यांजवळ मचान लावून पशु गणना केली जाते. मात्र पाणवठ्यांमध्ये पाणीच नसल्याने वन्यजीव तलावाकडे येणार नाही. त्यामुळे वन्यजीवांची गणना कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे.जंगलाची तोड थांबावी, यासाठी वन विभागाने नागरिकांना सिलिंडर गॅसचे वाटप केले आहे. मात्र त्याचा अपेक्षित परिणाम झाला असल्याचे दिसून येत नाही. ज्या नागरिकांकडे गॅस आहे, ते नागरिक सुद्धा अजूनही जंगलातील सरपण आणून चुलीवर स्वयंपाक करीत असल्याने जंगलाची तोड थांबली नाही. पाणवठे आटल्याने वन्यजीव पाण्याच्या शोधात फिरत आहेत. त्यामुळे त्यांची शिकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. १ फेब्रुवारी रोजी वैरागडजवळील तलावात वन्यजीवाची शिकार करण्यासाठी विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. यामध्ये एका व्यक्तीला प्राण गमवावा लागला. त्यानंतरही वन विभाग फारसा गंभीर झाला नसल्याने वन्यजीवांच्या शिकारीचे प्रमाण सुरूच आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.