लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : आदिवासी शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानामुळे शेतीवर होणाºया दुष्परिणामापासून सावध राहिले पाहिजे. तसेच आदिवासी शेतकºयांनी आधुनिक शेतीकडे वाटचाल करावी, असे आवाहन आदिवासी विकास वने, राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.आदिवासी विकास विभाग व पोर्ला इन्सिट्यूट आॅफ साऊथ आशिया बिसा यांच्या पुढाकाराने अहेरी येथे शुक्रवारी अहेरी तालुक्यातील १० व एटापल्ली तालुक्यातील १० अशा एकूण २० लाभार्थ्यांना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते प्रायोगिक तत्त्वावर मिनी राईसमिलचे वाटप करण्यात आले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक जिल्हाधिकारी तथा अहेरीच्या प्रकल्प अधिकारी इंदुराणी जाखड होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर, समाजकल्याण सभापती माधुरी उरेते, अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, भामरागडचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे, अहेरीचे सहायक प्रकल्प अधिकारी श्रीकांत धोटे, डॉ.प्रकाश नाईक, प्रफुला राऊत, आशिष नाफडे आदी मान्यवर उपस्थित होते.हवामानातील विषमतेचा शेती उत्पादनावर अनिष्ठ परिणाम होत आहे. अहेरी उपविभागात शेतीच्या उत्पन्नात स्थैर्य येण्यासाठी तसेच तंत्रज्ञानाचा परिस्थितीनुरूप वापर करून शेती उत्पादनात विविधता आणून शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत हवामान सुसंगत गाव प्रकल्प महाराष्टÑातील पालघर, पुणे व गडचिरोली या निवडक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात या प्रकल्पाअंतर्गत २०० गावांची निवड करण्यात आली असून यापैकी २० प्राथमिक गावांना प्रत्येकी एक याप्रमाणे मोबाईल मिनी राईसमिलचे वाटप करण्यात आले.प्रास्ताविक डॉ.प्रकाश नाईक, संचालन सतीश पडघन यांनी केले. तर आभार आशिष नाफडे यांनी मानले.
आधुनिक शेतीकडे वळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 01:35 IST
लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : आदिवासी शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानामुळे शेतीवर होणाºया दुष्परिणामापासून सावध राहिले पाहिजे. तसेच आदिवासी शेतकºयांनी आधुनिक ...
आधुनिक शेतीकडे वळावे
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे आवाहन : शेतकरी महिलांना २० मिनी राईसमिलचे वाटप