शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन वाढीकरिता मधमाशी पालनाकडे वळा

By admin | Updated: March 18, 2016 01:29 IST

मधुमक्षिका पालनातून मध, मेण तसेच आयुर्वेदिक दृष्टीने अनेक महत्त्वाचे पदार्थ प्राप्त होत असतात.

तात्यासाहेब धानोरकर : कृषी महाविद्यालयात मधमाशी पालन जाणीव जागृती कार्यक्रमगडचिरोली : मधुमक्षिका पालनातून मध, मेण तसेच आयुर्वेदिक दृष्टीने अनेक महत्त्वाचे पदार्थ प्राप्त होत असतात. शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाला जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन महत्त्वाचा व्यवसाय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीकरिता मधुमक्षिका पालनाकडे वळावे, असे आवाहन भारतीय समाज प्रबोधन संस्था वरोराचे सचिव डॉ. तात्यासाहेब धानोरकर यांनी केले. कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र व कृषी संशोधन केंद्र गडचिरोली आणि भारतीय समाज प्रबोधन संस्था वरोरा तसेच केंद्रीय मधमाशी पालन संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मधमाशी पालन जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्रात बुधवारी करण्यात आले. यावेळी डॉ. धानोरकर बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय कृषी अधिकारी एम. के. सोनटक्के यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप लांबे, डॉ. पुरूषोत्तम नेहरकर, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. ब्राम्हणकर उपस्थित होते. शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून मधमाशी पालनाची एक चळवळ निर्माण करणे गरजेचे आहे. मधमाशी पालनासाठी शासकीय योजना, प्रकल्प तयार करणे याबाबत मार्गदर्शन केले जाते, याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन सोनटक्के यांनी केले. डॉ. लांबे यांनी मधमाशी पालनाचे तंत्र सांगितले. मधमाशीचे वर्तन, मध गोळा करण्याची पद्धती, वसाहत नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. नेहरकर यांनी मधमाश्यांचे विविध प्रकार, पोळे, मधमाश्यांचा इतिहास याबाबत माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. शुभांगी अलेक्झांडर, संचालन शुभम मेश्राम तर आभार डॉ. विजय काळपांडे यांनी मानले. धोंडगे, सरोदे, सातार, सरप, भोंगळे, राठोड, मुरतेली, गेडाम, कावळे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)