शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

तूर डाळ गरिबांच्या भोजनातून गायब

By admin | Updated: March 19, 2015 01:28 IST

तूर डाळीच्या अत्यल्प उत्पादनामुळे डाळीचे भाव गगनाला भिडले आहेत़ दोन महिन्यांपूर्वी ५५ ते ७० रूपये प्रति किलोप्रमाणे मिळणारी तुरीची डाळ ९० ते १०० रूपयांपर्यंत पोहोचली आहे़ ....

महेंद्र चचाणे देसाईगंजतूर डाळीच्या अत्यल्प उत्पादनामुळे डाळीचे भाव गगनाला भिडले आहेत़ दोन महिन्यांपूर्वी ५५ ते ७० रूपये प्रति किलोप्रमाणे मिळणारी तुरीची डाळ ९० ते १०० रूपयांपर्यंत पोहोचली आहे़ पावसामुळे यावर्षी तुरीचे पीक खराब झाल्याने तूर डाळीचे दर प्रचंड वाढले आहेत. पुढेही दरवाढीची शक्यता असल्याने तुरीच्या डाळीचे वरण गरिबांच्या ताटातून गायब होण्याची चिन्हे आहेत़ सध्या चपातीची संगत डाळीने सोडली आहे़ मार्चमध्ये तूर, चना, वाटाणा, मसूर, मूग आदी पीक बाजारात येईल, परंतु गारपिटीमुळे या मालाला प्रचंड प्रमाणात तडाखा बसला आहे. त्यामुळे उत्पन्न हवे तसे मिळणार नाही व नुकसानीमुळे तुरीही बऱ्याच प्रमाणात खराब झाल्या आहेत. त्यामुळे त्याला चांगला भाव मिळणे कठण्ीा आहे.मागील वर्षी तुरीचे उत्पादन चांगले झाले़ त्यामुळे तुरीचे भाव आटोक्यात होते़ मात्र अत्यल्प उत्पादनामुळे दोन महिन्यांतच तुरीच्या डाळीने शंभरी गाठायची तयारी दाखविली आहे़ ठोक बाजारात एक महिन्यातच तुरीचे दर पाच हजारावरून सहा हजार शंभर रुपयांवर गेले. कर्नाटक तूर ६ हजार ३०० रुपये आणि बर्मा येथील आयातीत तूर सहा हजारांवर असून वाहतुकीच्या खर्चासह प्रतिक्विंटल दर ६ हजार २०० रुपयांवर पोहोचले आहेत, अशी माहिती स्थानिक ठोक धान्य व्यापाऱ्यांनी दिली आहे़ त्यामुळे बाहेरून आलेल्या मालावर परिणाम पडलेला आहे़ व्यापारही प्रभावित झाला आहे.