शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

आरमोरी तालुक्यातील ३६ हजार हेक्टर सिंचन क्षमतेचा 'तुलतुली प्रकल्प' कागदावरच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 18:39 IST

वनकायद्याचा खोडा : २ हजार हेक्टर वनजमिनीचे हस्तांतरण रखडले; स्थानिकांचाही विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कमानापूर: आरमोरी तालुक्याच्या तुलतुली गावाजवळ जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सिंचन प्रकल्पाला ४५ वर्षापूर्वी मान्यता मिळाली. दहा वर्षांनंतर किरकोळ कामांना सुरुवातही झाली. या प्रकल्पाचे धरण क्षेत्रातील प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वीच १९८० चा वनकायदा आड आला. प्रकल्पामुळे बुडीत क्षेत्रवाढीचा धोका ओळखून स्थानिक व परिसरातील शेतकऱ्यांनीही विरोध केल्याने प्रकल्पाचे काम पुढे सरकले नाही, ते कागदावरच राहिले.

मानापूर (देलनवाडी) परिसरातील तुलतुली गावाजवळ खोब्रागडी नदीवर १७ डिसेंबर १९७८ रोजी सिंचन प्रकल्पास मान्यता मिळाली. त्यावेळी प्रकल्प किंमत १९.१५ कोटी रुपये होती. या प्रकल्पामुळे ३६ हजार ७७२ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार होती, तसेच प्रकल्पात एकूण २८४.८७ द.ल.घ.मी. पाणीसाठा क्षमता होती. या प्रकल्पाकरिता २२२८.०६ हेक्टी वनजमिनीची आवश्यकता होती; परंतु केंद्र शासनाने ३ ऑगस्ट १९९९ व ९ एप्रिल २००२ रोजी दोनवेळा वनजमिनीस मान्यता नाकारली. मात्र, तत्पूर्वी प्रकल्पाच्या प्राथमिक कामाला १९८० मध्ये सुरुवात झाली होती. त्यावेळी धरणस्थळाकरिता पोचमार्ग, स्थायी/अस्थायी इमारत, गोदाम, धरणस्थळाचे स्ट्रिपिंग ही कामे मे १९८३ पर्यंत सुरू होती. 

नियामक मंडळाकडून 'जैसे थे'चे आदेश

  • केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रकल्पनिर्मितीतील अडचण दूर करण्यासाठी व पर्यायी प्रकल्प होण्याच्या दृष्टीने अभ्यास नागपूर पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळाने प्रकल्पाचा अभ्यास केला. ११ जून २०१० मध्ये प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी २४३.८० मी.ऐवजी २३८ मीटरपर्यंत घटवून नागपूर जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे अहवाल पाठविला.
  • मात्र, प्रकल्पासाठी निश्चित केलेली वनजमीन कमी केली नसल्याचे कारण पुढे करून सदर प्रकल्प रद्द करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक कार्यालयास पाठविला. त्यानंतर नियामक मंडळाच्या बैठकीत सदर प्रकल्प रद्द करणे संयुक्तिक नाही, असे ठरवून प्रकल्प 'जैसे थे' ठेवण्यात आला.

६.२१ कोटींचा खर्चतुलतुली प्रकल्पाच्या बाह्यक्षेत्रातील विविध कामांवर मार्च २०१९ अखेर ६.२१ कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. प्रकल्पासाठी मंजूर झालेला १२.९५ कोटी निधी अखर्चित आहे. दरम्यान, दवंडी व मांगदा या ठिकाणी कर्मचारी वसाहत बांधण्यात आली. मात्र, सध्या येथील इमारती मोडकळीस आल्या आहेत. याशिवाय धरण, बॅरेज, पंपगृह, कालवा डावा/उजवा, शाखा, वितरिका, लघुकालवे, तसेच इतर कामांवर निधी खर्च प्रस्तावित होता.

४० गावे २२५४.९२८ हेक्टर खासगी जमीन बुडीत क्षेत्रात जाणारपुनर्वसनासाठी प्रस्तावित होते. यात २ हजार २३७ घरे व १० हजार ३५४ लोकसंख्येचा समावेश होता. आता ही लोकसंख्या व वस्त्याही वाढलेल्या आहेत.

"तुलतुली परिसरात जंगल व अन्य वनसंपदा आहे. लोकांची उपजीविका जंगलावर आधारित आहे. प्रकल्पामुळे हजारो हेक्टर वनजमीन बाधित होण्याचा धोका होता. याच कारणाने स्थानिक नागरिकांनी प्रकल्पनिर्मितीस विरोध केला. हा प्रकल्प बुडीत क्षेत्र वाढविणारा आहे."- भजन मडकाम, नागरिक तुलतुली तथा माजी सभापती पं.स., आरमोरी

"तुलतुली प्रकल्पासाठी वनजमिनीच्या हस्तांतरणाची मान्यता शासनाकडून मिळाली नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे काम सद्यःस्थितीत बंदच आहे. शासनाकडून मान्यता मिळत नसल्याने अडचणीत आहेत."- एच. एस. कछवा, उपविभागीय अधिकारी, तुलतुली प्रकल्प 

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीarmori-acअरमोरी