शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

तेंदूपत्त्याने भरलेल्या ट्रकला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 21:30 IST

तेंदूपत्त्याची पोती भरून जात असलेल्या ट्रकला आग लागल्याने तेंदूपत्त्यासह ट्रक जळून खाक झाल्याची घटना सोमवारी दुपारी ४ वाजता आलापल्ली येथे घडली. ट्रकमध्ये जवळपास ३० लाखांचा तेंदूपत्ता होता.

ठळक मुद्देवीज तारांना स्पर्श : आलापल्ली येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : तेंदूपत्त्याची पोती भरून जात असलेल्या ट्रकला आग लागल्याने तेंदूपत्त्यासह ट्रक जळून खाक झाल्याची घटना सोमवारी दुपारी ४ वाजता आलापल्ली येथे घडली. ट्रकमध्ये जवळपास ३० लाखांचा तेंदूपत्ता होता.फळीवर गोळा केलेला तेंदूपत्ता आता गोदामात साठविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी ट्रकच्या मदतीने तेंदूपत्त्याची वाहतूक केली जात आहे. सीजी ०८ एएच ९१११ क्रमांकाचा ट्रक वेलगूर येथून तेंदूपत्ता घेऊन बल्लारपूरकडे जात होता. आलापल्ली शहरातून ट्रक जात असताना ट्रकवरील पोत्यांचा वीज तारांना स्पर्श झाला. त्यामुळे ट्रक लागली. ट्रकमध्ये केवळ वाहन चालक असल्याने ट्रकला लागलेली आग ट्रक चालकाच्या लक्षात आली नाही. आलापल्ली येथील युवकांना ट्रक जळत असल्याची बाब लक्षात आली. सदर घटना ट्रक चालकाच्या लक्षात आणून दिली. गावात ट्रक उभा ठेवल्यास इतर दुकाने व घरांना आग लागण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहन चालकाने ट्रक गावाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आलापल्ली येथील राम मंदिरापासून ते जेमतेम रेड्डी पार्कपर्यंतच वाहन जाऊ शकले. यादरम्यान वाहन जात असताना जळते तेंदूपत्त्याचे पोते रस्त्यावर पडत होते. त्यामुळे राम मंदिर ते रेड्डीपार्कपर्यंत आग पसरल्याचे चित्र निर्माण झाले होते. वाहन चालकाने शहीद अजय मास्टे चौकातून सिरोंचाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहन वळवून उभे केले. या सर्व घटनेत सुदैवाने वाहन चालक सुरक्षित आहे. अहेरीचे पोलीस निरिक्षक सतिश होडगर यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. अग्निशमन दलाच्या वाहनाचे चालक नसल्याने वाहन उपलब्ध झाले नाही. काही वेळातच ट्रक जळून खाक झाला.ओव्हरलोड तेंदूपत्ता नेणाऱ्या वाहनांवर कारवाई नाहीतेंदूपत्ता हलका राहत असल्याने ट्रकपेक्षा अधिक उंचावर पोते भरले जातात. या पोत्यांचा गावातील वीज तारांना स्पर्श होऊन आगी लागल्याच्या घटना घडतात. अशा वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व वाहतूक पोलीस यांच्या मार्फत कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस उंचच उंच तेंदूपत्त्याच्या थप्प्या ट्रकमध्ये भरण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वाहनांवर कारवाई होणे आवश्यक आहे.