शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
4
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
5
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
6
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
8
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
11
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
12
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
13
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
14
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
16
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
17
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
18
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
19
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
20
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?

सामाजिक समता प्रस्थापित करणारे खरे महानायक छत्रपती शिवाजी

By admin | Updated: February 20, 2016 02:06 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील समाज व्यवस्था समान होती. नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांनी भेदभाववृत्तीला कधीही थारा दिला नाही.

शिव जयंती सोहळा : मोहम्मद अय्युब यांचे प्रतिपादन गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील समाज व्यवस्था समान होती. नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांनी भेदभाववृत्तीला कधीही थारा दिला नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या नैतिक शौर्य व वीरतेच्या बळावरहिंदवी स्वराज्य निर्माण केले. सामाजिक समता प्रस्थापित करणारे छत्रपती शिवाजी महाराज खरे महानायक होते, असे प्रतिपादन जमाते इस्लामी हिंद नागपूरचे पदाधिकारी प्रा. मोहम्मद अय्युब यांनी केले. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व इतर सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी येथील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित शिव जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादाजी चापले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून यवतमाळ येथील भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय प्रचारक डॉ. समीर कदम होते. प्रमुख अतिथी म्हणून बावणे कुणबी समाज संघटनेचे प्राचार्य तेजराव बोरकर, प्रा. मुकेश उरकुडे, प्रा. सूर्यकांत भोंगळे, रत्नदीप म्हशाखेत्री, देवानंद कामडी, सुरेश भांडेकर, चंद्रकांत लेनगुरे, रामदास होकम, दत्तात्रेय खरवडे, नामदेव शेंडे, जनार्धन ताकसांडे, अशोक गडकरी, दिलीप माणुसमारे, सुरेश मांडवगडे, रफिक कुरैशी, गोवर्धन चव्हाण, धर्मानंद मेश्राम, पांडुरंग भांडेकर, डी. एन. बर्लावार आदी मान्यवर उपस्थित होते. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात समाज व्यवस्था’ या विषयावर बोलताना प्रा. मोहम्मद अय्युब म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये लहानपणापासून नेतृत्त्व गुण होते. शिवाजी महाराजाला माता जिजाऊ यांनी लहानपणापासून वीरगाथा ऐकविल्या. त्यामुळेच त्यांच्यात शौर्यगुण ओतप्रोत होते. समाजातील भ्रष्टाचार, दुराचार, व्यभिचार व अत्याचाराविरोधात शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारले. शिवाजी महाराज यांना सर्व जाती धर्माच्या लोकांविषयी आदरभाव होता. छत्रपती शिवाजी महाराज आध्यात्मिक होते. त्यांनी आपला राज्यकारभार पूर्ण जबाबदारीने व न्यायाने केला. त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. अशा जबाबदार महानायकाची आता महाराष्ट्राला गरज आहे, असेही मोहम्मद अय्युब यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष पांडुरंग नागापुरे, संचालन संध्या येलेकर, स्मिता लडके यांनी केले तर आभार विनायक बांदूरकर यांनी मानले. कार्यक्रमाला प्राचार्य खुशाल वाघरे, दादाजी चुधरी, प्रा. शेषराव येलेकर, सुरेश लडके, एस. टी. विधाते, सुरेश डोंगे, राजेंद्र गोहणे, पी. एम. झंझाळ, पुरूषोत्तम म्हस्के, प्राचार्य घनश्याम दिवटे आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)