शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:40 IST

ट्रकने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील कुनघाडा रै. बसथांब्याजवळ घडली.

ठळक मुद्देकुनघाडा थांब्याजवळील घटना : २० फुटापर्यंत फरफटत नेले

लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी मो. : ट्रकने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील कुनघाडा रै. बसथांब्याजवळ घडली.श्रीकृष्ण वामन काटवे (३८) रा. कुनघाडा असे मृतकाचे नाव आहे. श्रीकृष्ण काटवे हा एमएच ३३ एस ७२६६ क्रमांकाच्या दुचाकीने गुरूवारी सकाळी तांबाशी येथे इंजिन दुरूस्त करणाºया मेकॅनिककडे जात होता. दरम्यान एमएच ३४ एबी ८८९५ क्रमांकाचा ट्रक गडचिरोलीवरून चामोर्शीकडे जात होता. या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार श्रीकृष्ण काटवे यांचा जागीच मृत्यू झाला.याबाबतची माहिती पोलीस पाटील दिलीप पवार यांना कळताच पोलीस उपनिरिक्षक मल्हार थोरात यांना भ्रमणध्वनीवरून याबाबतची माहिती दिली. त्यांनी चामोर्शी जवळच ट्रकला पकडले. मात्र ट्रक ड्रायवर पसार झाला. ट्रकने श्रीकृष्ण काटवे यांना २० फूटापर्यंत दुचाकीसह फरफटत नेले. यामुळे त्यांच्या हातपाय तुटून डोक्याचाही चेंदामेंदा झाला. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मालवाहू वाहनाच्या धडकेत एक ठारआष्टी : आष्टीवरून दुचाकीने चौडमपल्ली येथे जात असलेल्या दुचाकीला आलापल्लीवरून भरधाव वेगाने येणाºया पिकअप वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास चंदनखेडी गावाजवळ घडली.नागेश शंकर सिडाम (२१) रा. रामय्यापेठ ता. सिरोंचा असे मृतकाचे नाव आहे. नागेश हा आष्टी परिसरात ट्रॅक्टरने नांगरणीचे काम करण्यासाठी आला होता. ट्रॅक्टरचे डिझेल संपल्याने तो आष्टी येथून पेट्रोल डिझेल घेऊन परत चौडमपल्ली येथे जात होता. दरम्यान आलापल्लीवरून आष्टीकडे येणाºया एमएच ३३-१८१४ या क्रमांकाच्या टाटा पिकअप वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये नागेश सिडाम हा जागीच ठार झाला. तर विक्की सुरेश लखमवार (१८) हा गंभीर जखमी झाला. त्याला गडचिरोली येथील रूग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळावरून चालक पसार झाला. सदर वाहन गणेश ट्रान्सस्पोर्ट तळोधी मो. येथील गणेश देवराव दुधबळे यांच्या मालकीचे आहे.