शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

ट्रकची ट्रॅक्टरला धडक, आठ जखमी

By admin | Updated: May 1, 2016 01:08 IST

आरमोरीकडून गडचिरोलीकडे पोकलँड मशीन घेऊन येणाऱ्या भरधाव ट्रकने ओव्हरटेकच्या प्रयत्नात ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने सदर दोन्ही वाहने कठाणी नदीच्या पुलावरून खाली कोसळली.

कठाणी नदीच्या पुलावरील घटना : दोन्ही वाहने नदीपात्रात कोसळलीगडचिरोली : आरमोरीकडून गडचिरोलीकडे पोकलँड मशीन घेऊन येणाऱ्या भरधाव ट्रकने ओव्हरटेकच्या प्रयत्नात ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने सदर दोन्ही वाहने कठाणी नदीच्या पुलावरून खाली कोसळली. यात आठ जण जखमी झाले. सदर घटना शनिवारी सकाळी ५.३० वाजता सुमारास गडचिरोलीपासून तीन किमी अंतरावर घडली.या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये ट्रकमधील ट्रकचालक सतीश मल्लेश बंडू (३२) रा. गोदावरी कन्ही ता. जि. करिमनगर, ट्रक क्लिनर शेख पाशा शेख लाल मोहम्मद (४५) रा. रामक्रिष्णपूर ता. जि. आदिलाबाद, पोकलँडचालक दश क्रिष्णा राजय्या सेमाला (१९), नरेश रामय्या सेमाला (२६) रा. कोरेम ता. गाईदपल्ली जि. करिमनगर तसेच ट्रॅक्टरवरील ट्रॅक्टरचालक प्रफुल मधुकर मंगर (२५), नीलकंठ नामदेव चौधरी (३८), सुशील दिवाकर बांगरे (२४), संतोष नत्थू बांगरे (३५) सर्व राहणार अडपल्ली ता. गडचिरोली यांचा समावेश आहे. या अपघातात ट्रकवरील प्रल्हाद राजय्या सेमाला (२७) रा. कोरेम ता. गाईतपल्ली जि. करिमनगर व ट्रॅक्टरवरील प्रमोद दिवाकर म्हशाखेत्री (३०), जगदीश रामदास चौधरी (३०) दोघेही रा. अडपल्ली हे तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. ट्रकचालक सतीश मल्लेश बंडू व ट्रॅक्टरचालक प्रफुल मधुकर मंगर हे दोघेजण गंभीर आहेत. जखमी आठही जणावर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. एपी-२९-पीए-७८२८ क्रमांकाचा ट्रक पोकलँड मशीन घेऊन वर्धेवरून करिमनगरसाठी निघाला. आरमोरीवरून गडचिरोलीकडे येत असताना एमएच-३३-एफ-५७४ क्रमांकाच्या ट्रॅक्टरला मागून जबर धडक दिली. सदर अपघात इतका भिषण होता की, भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला धडक देऊन जवळपास ३० फुटापर्यंत ट्रॅक्टरला फरफटत नेले. त्यानंतर दोन्ही वाहन पुलाच्या खाली नदीपात्रात कोसळले. सदर दोन्ही वाहने प्रचंड क्षतीग्रस्त झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल होऊन जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताची माहिती मिळताच गडचिरोली व अडपल्ली, गोगाव येथील नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या पाहण्यासाठी गर्दी केली. या अपघाताची नोंद गडचिरोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे. सदर पुलावर यापूर्वीही अनेकदा अपघात घडले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)